Soybean Procurement: सोयाबीन खरेदीला मुदतवाढीची गरज; निम्मे शेतकरी खरेदीच्या प्रतिक्षेत

Soybean Market Update: राज्यातील नोंदणी केलेले जवळपास ४ लाख शेतकरी खेरदीची प्रतिक्षेत आहेत. तर २४ जानेवारीपर्यंत केवळ ७ लाख ५४ हजार टन सोयाबीनची खरेदी झाली.
Soybean
SoybeanAgrowon
Published on
Updated on

Pune News: राज्यातील नोंदणी केलेले जवळपास ४ लाख शेतकरी खेरदीची प्रतिक्षेत आहेत. तर २४ जानेवारीपर्यंत केवळ ७ लाख ५४ हजार टन सोयाबीनची खरेदी झाली. सोयाबीन खरेदीची मुदत ३१ जानेवारीपर्यंत आहे. पण या मुदतीत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची खरेदी होऊ शकणार नाही किंवा उद्दीष्ट पूर्ण होणार नाही. त्यामुळे सरकारने सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. 

सरकारने पहिली मुदत संपल्यानंतर राज्यात सोयाबीन खेरदीसाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तर राज्यात यंदा १४ लाख १३ हजार टन सोयाबीन खरेदीचे उद्दीष्ट आहे. तर पहिल्या टप्प्यातील उद्दीष्ट १० लाख टन दिले आहे. पहिल्या टप्प्यातील उद्दीष्ट पूर्ण झाल्यानंतर पुन्हा उद्दीष्ट वाढवून देऊ, असे सरकारने म्हटले आहे. राज्यात २४ जानेवारीपर्यंत ७ लाख ५४ हजार नट सोयाबीनची खरेदी केली. ही खरेदी पहिल्या टप्प्यातील उद्दीष्ट्या तुलनेत ७५ टक्के आहे. तर एकूण उद्दीष्टाच्या तुलनेत केवळ ५३ टक्के आहे. म्हणजेच अजूनही खरेदी उद्दीष्टापासून लांबच आहे. 

Soybean
Soybean Procurement : शेतकऱ्यांना ‘नाफेड’च्या संदेशाची प्रतीक्षा

राज्यात खरेदी सुरु होऊन आता १०२ दिवस पूर्ण झाले. पण यापैकी खरेदी सुरळीत चालेले दिवस निम्मेच असतील, असे खेरदी केंद्र चालकांनी सांगितले. त्यामुळेच या १०२ दिवसांमध्ये राज्यात राज्यात केवळ ३ लाख ६० हजार शेतकऱ्यांच्याच सोयाबीनची खरेदी होऊ शकली. तर ४ लाख शेतकरी आजही खरेदीची वाट पाहत आहेत. तर केवळ ७ लाख ५४ हजार टनांचीच खरेदी झाली. 

Soybean
Soybean Procurement Target: उद्दीष्ट संपले तरी सोयाबीन खरेदी सुरुच राहणार; जिल्हांना मिळणावर वाढीव उद्दीष्ट

आता ३१ जानेवारीपर्यंत ४ लाख शेतकऱ्यांच्या सोयाबीन खेरदीचे उद्दीष्ट आहे. पण या शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी होणारच नाही. अनेक शेतकऱ्यांना वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन खेरदी करण्यासाठी मुदतवाढ देण्याची गरज आहे. खरेदीला आणखी महिनाभराची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. 

सोयाबीन बाजारभाव

चालू हंगामात सुरुवातीपासूनच सोयाबीनचे भाव हमीभावापेक्षा किमान ९०० रुपयांनी कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना किमान हमीभावाची तरी अपेक्षा आहे. सरकारनेही निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना हमीभाव देऊ असे आश्वासन दिले आहे. सरकारने आता आश्वानस दिल्याप्रमाणे किमान नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे तरी सोयाबीन खरेदी करावे, अशी मागणी शेतकरी करु लागले आहेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com