
Market Bulletin:
कांदा दरात सुधारणा
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील २० टक्के शुल्क काढल्यानंतर आज दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. देशातील अनेक बाजारात कांदा दर आज १०० ते २०० रुपयांनी वाढले होते. तर कांदा आवक स्थिर होती. कांद्याला आज सरासरी १२०० ते १४०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. दुसरीकडे बाजारातील कांदा आवक वाढत आहे. एप्रिल महिन्यात कांदा आवक चांगली राहील. पण निर्यात शुल्क काढल्याचा आधारही कांदा बाजाराला मिळेल, असे निर्यातदारांनी सांगितले.
कलिंगडाची आवक वाढली
उन्हाचा चटका वाढत असल्याने कलिंगडालाही मागणी वाढली आहे. दुसरीकडे बाजारातील आवकही वाढत आहे. अनेक भागात कलिंगड प्लाॅट्सची काढणी वेगाने सुरु आहे. हा माल विक्रीसाठी बाजारात येत आहे. याचा दबाव दरावर दिसून आला. कलिंगडाचे भाव क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांनी दोन आठवड्यात कमी झाले. सध्या कलिंगडाला प्रतिक्विंटल सरासरी ७०० ते ९०० रुपये भाव मिळत आहे. कलिंगडाची बाजारातील आवक पुढील काही आठवड्यांमध्ये कमी होत जाईल. त्यामुळे दरातही वाढ होईल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
कारली टिकून
राज्यातील बाजारात कारल्याची आवक स्थिर आहे. तर दुसरीकडे आल्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे कारल्याचे भाव टिकून आहेत. कारल्याला सध्या बाजारात सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत. कारळ्याची बाजारातील आवक यापुढेही मर्यादीत राहण्याचा अंदाज आहे. तर कारल्याला उठाव चांगला राहील. याचा आधार दराला मिळेल. त्यामुळे कारल्याचे दर आणखी काही आठवडे कायम राहतील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
सोयाबीन दबावातच
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात चढ उतार सुरुच आहेत. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत १०.०५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंड २९८ डाॅलर प्रतिटनांपर्यंत कमी झाले होते. देशात प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव ४ हजार १०० ते ४ हजार २५० रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला ३ हजार ८०० ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. सोयाबीनची बाजारातील आवक स्थिर आहे. सोयाबीन भावावरील दबाव आणखी काही आठवडे कायम राहील, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
कापसाचे दर टिकून
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात चढ उतार सुरुच आहेत. कापसाचा भाव आजही कमी झाला. आज दुपारपर्यंत वायदे ६५.१३ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते. देशातही कापसाच्या भावात आज काहीसे चढ उतार दिसून आले. आज देशातील कापूस आवक कमीच होती. तर कापसाला सरासरी ७ हजार १०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. देशातील कापसाची आवक दिवसेंदिवस होत जाईल. याचा आधार दराला मिळू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.