Lemon Market : कर्नाटकी लिंबाच्या आवकेमुळे दर दबावात

Lemon Rate : कळमना बाजार समितीत आंबिया बहारातील लिंबाची आवक सुरू झाली असून गेल्या आठवड्यात ती २५० क्‍विंटलवर पोहोचली. त्यानंतर आता १०० क्‍विंटल इतकी आवक रोज होत आहे.
Lemon Rate
Lemon MarketAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : कळमना बाजार समितीत आंबिया बहारातील लिंबाची आवक सुरू झाली असून गेल्या आठवड्यात ती २५० क्‍विंटलवर पोहोचली. त्यानंतर आता १०० क्‍विंटल इतकी आवक रोज होत आहे. त्यातूनच लिंबाचे दर दबावात आले आहेत. ५००० ते ६००० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळत आहे. बिजापूर (कर्नाटक) भागात उत्पादित हा लिंबू असल्याचे सांगितले जाते.

लिंबाचे मृग, हस्त आणि आंबिया असे तीन बहार घेतले जातात. तापमानात वाढ होताच साधारणतः फेब्रुवारीत हस्त बहारातील लिंबाची आवक बाजारात होते. त्यामुळे दर स्थिर राहतात. यंदा मात्र मॉन्सूनोत्तर पावसाचा फटका बसल्याने हस्त बहारातील फुल आणि फळधारणा झालीच नाही.

Lemon Rate
Lemon Rate : उन्हाच्या तडाख्याने लिंबाच्या दरात उसळी

परिणामी बाजारात आवक प्रभावित झाली. त्यातच तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने लिंबाला मागणी देखील वाढली. याचा परिणाम दरावर होत ते ८००० ते १०००० रुपये क्‍विंटलवर पोहोचले. हंगामातील हे सर्वात उच्चांकी दर असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून बाजारात लिंबाची आवक वाढती आहे.

त्यातूनच मंगळवारी (ता. ११) लिंबाची १३० क्‍विंटल इतकी आवक नोंदविण्यात आली. त्याचा परिणाम दरावर होत ते ५००० ते ६००० रुपयांपर्यंत खाली आले. शनिवारी (ता. १५) पुन्हा आवक कमी झाल्याने लिंबाचे दरात तेजी नोंदविली गेली. ८००० ते ९००० रुपयांवर दर पोहोचले. आता आवक १०० क्‍विंटलवर स्थिरावली असून ५००० ते ६००० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळत आहे.

Lemon Rate
Lemon Market Rate : लिंबाचे दर पोहोचले ८००० रुपये क्‍विंटलवर

अमरावती बाजारात दर उच्चांकी

कळमना बाजारात लिंबू दरात घसरण झाली आहे. त्याचवेळी अमरावती बाजारात मात्र आवक दहा क्‍विंटल इतकी अत्यल्प होती. त्यामुळे या ठिकाणी दर तेजीत असून ७००० ते १०००० रुपये क्‍विंटलने लिंबाचे व्यवहार अमरावती बाजारात होत आहेत.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या बागांतील आंबिया बहाराच्या लिंबाची आवक होईल. त्यानंतर दर आणखी दबावात येतील. सद्या बिजापूर (कर्नाटक) मधून लिंबू आवक होत असल्याने अनेक भागात लिंबू दर दबावात आले आहेत.
- अंकुश झंझाट, लिंबू बागायतदार, माहूलीचोर (अमरावती)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com