Agrowon Podcast: लसणाचे भाव घसरले! सोयाबीन, कापूस, गहू, हरभऱ्यातही नरमाई; आजचा बाजारभाव काय?

Agri Market Update: आज आपण सोयाबीन, कापूस, लसूण, गहू आणि हरभरा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market
Agriculture MarketAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin:

सोयाबीनमध्ये नरमाई

सोयाबीनचे भाव दबावातच आहेत. सोयाबीनला मिळणारा भाव शेतकऱ्यांना अडचणीत आणत आहे. सोयाबीनची बाजारातील आवक वाढली आहे. सरकारी खरेदी बंद झाल्यानंतर शेतकरी खुल्या बाजारात माल विकत आहेत. आजही देशातील बाजारात सोयाबीन सरासरी ३ हजार ८०० ते ४ हजार रुपयांनी विकले गेले. प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव आजही ४ हजार ३०० ते ४ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात चढ उतार सुरु आहेत. तर देशातील खुल्या बाजारातील सोयाबीनची आवक वाढत आहे. सोयाबीनवरील दबाव कायम राहील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Agriculture Market
Ginger Rate: आवक वाढल्याने आले दराची घसरण सुरूच!

कापसाचे भाव स्थिर

देशातील बाजारात कापसाचे भावही दबावातच आहेत. तर कापसाची आवक स्थिर दिसत आहे. कापसाची आवक सरासरी सव्वा लाख गाठींच्या दरम्यान आहे. बुधवारी देशातील बाजारात १ लाख २० हजार गाठींची आवक झाली होती. तर खुल्या बाजारात सरासरी भावपातळी ७ हजार ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहे. वायद्यांमध्ये कापसाच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही भावावरील दबाव कायम आहे. देशातील बाजारात कापसाची आवक आणखी काही आठवडे चांगली राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

गव्हाचे दरात चढ उतार

देशातील बाजारात गव्हाच्या भावात चढ उतार सुरु आहेत. सरकार खुल्या बाजारात गव्हाची विक्री करत असल्याने दरावर परिणाम दिसत आहे. गव्हाचा भाव देशभरात सरासरी ३ हजार ते ३ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होता पोचला. गव्हाची बाजारात आवक सुरु झाल्यानंतर भाव कमी होतील. पण चांगल्या मालाचे भाव हमीभावाच्या खाली जाण्याची शक्यता धुसर असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. यंदा सरकारला गव्हाची चांगली खरेदी करावी लागेल. तसेच बाजारातील पाईपलाईनही रिकामी आहे. म्हणजेच नवा माल बाजारात आल्यानंतर मागणीही चांगली राहील. याचाच आधार गव्हाच्या बाजाराला मिळू शकतो.

Agriculture Market
Green Pea Price: वाटाण्याच्या दरात निम्म्याने घट!

लसणामध्ये नरमाई

देशातील काही बाजारात लसणाची आवक सुरु झाली. नव्या मालाची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. लसणाला उठावही चांगला आहे. मात्र वाढत्या आवकेबरोबर भावातही चढ उतार दिसून येत आहेत. लसणाचे भाव मागील काही दिवसांमध्ये क्विंटलमागे आणखी २ ते ३ हजाराने कमी झाले आहेत. सध्या लसणाला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ते १० हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढील काळात लसणाची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम दरावर दिसून येईल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

हरभरा दर टिकून

हरभरा लागवडीच्या काळात असलेली भावातील तेजी आता कमी झाली. हरभरा बाजारात हमीभावाच्या आसपास विकला जात आहे. सरकारने यंदा हरभऱ्यासाठी ५ हजार ६५० रुपये हमीभाव जाहीर केला. तर बाजारात सध्या ५ हजार ३०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. देशातील काही बाजारात नव्या हरभऱ्याची एन्ट्री झाली. आणखी दोन आठवड्यानंतर बाजारात मालाची आवक वाढायला सुरुवात होईल. त्यानंतर १५ दिवसांमध्ये आवकेचा दबाव वाढेल. त्यावेळी हरभरा भाव हमीभावाच्या खाली जाऊ शकतात. पण सरकारही यंदा खरेदीत उतरणार आहे. त्यामुळे हरभरा बाजारालाही आधार असेल, असे अभ्यासकांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com