Ginger Market
Ginger MarketAgrowon

Ginger Rate: आवक वाढल्याने आले दराची घसरण सुरूच!

Market Update: मागील सहा महिन्यांपासून आलेच्या दरात सतत घसरण सुरू असून, मागील महिन्याच्या तुलनेत गाडीमागे (५०० किलो) १,००० ते १,५०० रुपयांची घट झाली आहे.
Published on

Satara News: ‘आलं तर आलं नाहीतर गेलं’ या म्हणीप्रमाणे आले पिकाची परिस्थिती झाली आहे. मागील सहा महिन्यांपासून दराच्या घसरणीचा फेरा सुरूच असून, मागील महिन्याच्या तुलनेत गाडीमागे एक ते दीड हजार रुपयांनी घसरण झाली आहे. सध्या आल्यास प्रतिगाडी (५०० किलो) ७५०० ते ८००० रुपये दर मिळत आहेत. दर घसरणीच्या भीतीने शेतकऱ्यांकडून आले काढणीकडे कल वाढत असल्याने बाजारात आले पिकाची आवक वाढली आहे.

मागील वर्षी दरात उच्चांकी दर गाठलेल्या आले पिकाच्या दराची कूच आता नीचांकीकडे सुरू आहे. मागील आले पिकाचे दर चांगले राहिल्याने गत वर्षी आले पिकाच्या क्षेत्रात तब्बल एक हजार हेक्टरने वाढ होऊन साडेचार हजार हेक्टरवर गेले असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. आले लागवड झाल्यानंतर दर टप्प्याटप्प्याने कमी होण्यास सुरुवात होऊन गत वर्षी नोव्हेंबर महिन्यात गाडीला १५ ते १६ हजार रुपये दरावर स्थिर होते.

Ginger Market
Ginger Price : आले पिकांच्या दरात दोन हजार रुपयांनी मोठी घसरण

त्यानंतरही दर घसरण सुरू राहिली आहे. डिसेंबर महिन्यात हे दर गाडीला १२ ते साडेबारा हजारांवर आले होते. हेच दर नवीन वर्षात कमी होऊन नऊ ते दहा हजारांवर आले आहेत. सध्या आले पिकास गाडीला ७५०० ते ८००० रुपये दर मिळत आहे. गतमहिन्यांच्या तुलनेत तब्बल एक ते दीड हजार रुपयांची घसरण झाली आहे. पुढील काळात अजून घसरण होईल या भीतीने आले काढण्याकडे कल वाढला असल्याने मार्केटमध्ये आल्याची आवक वाढत आहे.

Ginger Market
Ginger Rate : आल्याला प्रतिक्विंटल ३२०० ते ४००० रुपये दर

यामुळे दर घसरण होत आहे. सततच्या घसरणीमुळे खरेदीदार व्यापाऱ्यांकडून आले सौदे घेण्यावर परिणाम झालेला दिसून येत आहे. सौदे ठरले तरी व्यापाऱ्यांकडून आले खोदाई होत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. बियाणे काढणीच्या वेळी दरात काही प्रमाणात सुधारण्याचा अंदाज शेतकरी मार्च, एप्रिल महिन्यांत दर कमी होणार की वाढणार हे स्पष्ट होणार आहे.

दराची नीचांकीकडे वाटचाल

मागील पाच वर्षांपूर्वी प्रतिगाडीस चार ते पाच हजार रुपये नीचांकी दर मिळाला होता. हा दर शेतकऱ्यांना तसेच व्यापाऱ्यांनी न परवडणारा झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आले न काढता ते जमिनीत गाडले होते. सध्या प्रत्येक महिन्यात आले पिकाचे दर घसरण होत आहे. बियाण्याच्या काळात सुधारणा आले पिकांच्या दरात सुधारण्याची आशा कायम आहे. मात्र तसे न झाल्यास सर्वांत कमी दर या वेळी शेतकऱ्यांना मिळण्याचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com