Green Pea Price: वाटाण्याच्या दरात निम्म्याने घट!

Market Update: संक्रांतीनंतर बाजारातील मागणी घटल्याने आणि आवक वाढल्याने वाटाण्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात पंधरा दिवसांपूर्वी किलोला ५० रुपये मिळणारा वाटाणा आता २५ ते ३० रुपये किलो दराने विकला जात आहे.
Green Peas
Green PeasAgrowon
Published on
Updated on

Pune News: भोगी, संक्राती सणानंतर वाटाण्याची मागणी घटली आहे. मात्र आवक चांगली होत आहे. त्यामुळे पंधरा दिवसांत वाटाण्याच्या भावात निम्म्याने घट झाली आहे. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात १५ दिवसांपूर्वी किलोला ५० रुपये भाव मिळणारा वाटाणा आता किलोला दर्जानुसार २५ ते ३० रुपये किलो भाव मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

किरकोळ बाजारात ४० ते ५० रुपये किलो भावाने विक्री होत आहे. सध्या मार्केट यार्डातील तरकारी विभागात मध्य प्रदेशातून आवक होत आहे. गेल्या आठवड्यात १७ ते १८ ट्रॅक मटारची आवक झाली होती. सध्या त्यात घट होऊन १४ ते १५ ट्रक आवक होत आहे. येत्या काही दिवसांत मध्य प्रदेश आणि राजस्थानातील वाटाणा हंगाम सुरू होणार आहे. तेथून वाटाण्याची आवक वाढणार आहे. त्यामुळे भावात वाढ होण्याची शक्यता आहे.

Green Peas
Green Peas Farming : परभणी जिल्ह्यात रामभाऊंचा यशस्वी वाटाणा प्रयोग

स्थानिक भागांतून आवक कमी

स्थानिक वाटाणा हंगाम दोन ते तीन महिन्यांनी सुरू होऊन आवक सुरू होईल. पुरंदर, पारनेर, वाई आणि सातारा भागांतून आवक होत असते. मात्र मागील काही वर्षांत येथून होणारी आवक लक्षणीय कमी होत आहे. हवामान बदलाचा पिकावर झालेला परिणाम, घटलेली लागवड आणि उत्पादित भागात वाटाणा विक्री होत आहे. यामुळे स्थानिक वाटाणा आवक कमी असल्याचे अडते अमोल घुले यांनी सांगितले.

Green Peas
Green Pea Sowing : पुरंदरमधील शेतकऱ्यांचा वाटाणा पिकांकडे कल

वर्षभर मागणी असलेला वाटाणा

वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून, त्याच्या ओल्या दाण्यांना (मटार) भाजी तसेच स्नॅकवर्गीय पदार्थांसाठी मोठी मागणी असते. लागवडीनंतर अडीच ते तीन महिन्यांनंतर त्याचे उत्पादन सुरू होते. सात ते दहा दिवसांच्या फरकाने सतत काढणी करावी लागते. काढणी केल्यानंतर वाटाणा दहा दिवस टिकतो. ग्राहकांकडून त्यास वर्षभर मागणी असते.

मुख्य सण संक्रांतीनंतर वाटाण्याची बाजारातील आवक स्थिर आहे. मागणीही घटली आहे. त्यामुळे वाटाणाच्या भावात मोठी घट झाली आहे.
विलास भुजबळ, अडते, मार्केट यार्ड, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com