Agrowon Podcast : ज्वारीचा बाजार दबावातच; कापूस, सोयाबीन, ज्वारी तसेच काय आहेत आजचे आले दर?

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, ज्वारी, आले आणि तीळ पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market
Agriculture MarketAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये नरमाई

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शुक्रवारी नरमाई दिसून आली. सोयाबीनचे भाव कालच्या दरावरून आज पुन्हा कमी झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे ९.८७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले होते. तर सोयापेंड काहीसे कमी होऊन ३०५ डाॅलर प्रतिटनांवर बंद झाले होते. देशातील बाजारात प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आज ४ हजार ५५० ते ४ हजार ६५० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमधील व्यवहार ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांनी झाले. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.

कापसात चढ उतार

कापसाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायद्यांमध्ये शुक्रवारी नरमाई आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणीचा परिणाम भावावर दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे शुक्रवारी ७०.६६ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदे आज काहीसे वाढले होते. देशातील वायद्यांमध्ये कापूस वाढून ५६ हजार ०५० रुपये प्रतिखंडीवर होता. देशात कापसाचा सरासरी भाव आज ६ हजार ७०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. कापसाच्या भावातही चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.  

Agriculture Market
Agrowon Podcast : मक्याच्या बाजारात चढ उतार; कापूस, सोयाबीन, ज्वारी तसेच काय आहेत आजचे मका दर ?

ज्वारीचा बाजार दबावातच

देशभरात मागील दोन महिन्यांपासून ज्वारीचे भाव नरमलेले आहेत. ज्वारीच्या भावातील नरमाई वाढल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. आता खरिपातील ज्वारीही काही बाजारांमध्ये दाखल होत आहे. दुसरीकडे ज्वारीला उठावही चांगला आहे. पण  शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही. सध्या बाजारात ज्वारीला गुणवत्ता आणि वाणाप्रमाणे प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. ज्वारीच्या भावावरील दबाव कायम राहू शकतो, असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत. 

Agriculture Market
Soybean Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ४७८ केंद्रे

आल्याचा बाजार टिकून

आल्याचे भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिरावले आहेत. आल्याची लागवड यंदा वाढलेली दिसत असली तरी सध्या बाजारातील आवक खूपच कमी आहे. तर दुसरीकडे आल्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे आल्याचे भाव टिकून आहेत. सध्या आल्याची सरासरी भावापातळी सध्या ७ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

तिळाचे भाव स्थिर

तिळाच्या भावात मागील काही दिवसांमध्ये अनेक बाजारात काहिशी नरमाई दिसून आली. देशातील काही भागांमध्ये बाजारात तिळाची आवक वाढत आहे. त्यातच सध्या तिळाला उठाव कमी झालेला दिसत आहे. त्यामुळे तिळाच्या भावावर काहिसा दबाव दिसून येत आहे. सध्या तिळाला बाजारात सरासरी ११ हजार ते १३ हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळत आहे. पुढील काळात तिळाची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे, असे तीळ बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com