Agrowon Podcast : मक्याच्या बाजारात चढ उतार; कापूस, सोयाबीन, ज्वारी तसेच काय आहेत आजचे मका दर ?

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, मका, हिरवी मिरची आणि ज्वारी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Market Update
Market Update Agrowon
Published on
Updated on

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये नरमाई

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात काहिशी नरमाई दिसून आली. सोयाबीनचे भाव कालच्या दरावरून आज पुन्हा कमी झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत ९.८८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. तर सोयापेंड काहीसे कमी होऊन ३०८ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आज ४ हजार ५५० ते ४ हजार ६५० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमधील व्यवहार ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांनी झाले. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.

कापसात चढ उतार

कापसाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायद्यांमध्ये काल सुधारणा झाल्यानंतर आज काहिशी नरमाई दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणीचा परिणाम भावावर दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत ७१.७५ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदे आज काहीसे वाढले होते. देशातील वायद्यांमध्ये कापूस वाढून ५६ हजार ४०० रुपये प्रतिखंडीवर होता. देशात कापसाचा सरासरी भाव आज ६ हजार ७०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. कापसाच्या भावातही चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Market Update
Agrowon Podcast : कांदा दरात काहिशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत मका दर?

ज्वारीचा बाजार दबावातच

देशभरात मागील दोन महिन्यांपासून ज्वारीचे भाव नरमलेले आहेत. ज्वारीच्या भावातील नरमाई वाढल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. आता खरिपातील ज्वारीही काही बाजारांमध्ये दाखल होत आहे. दुसरीकडे ज्वारीला उठावही चांगला आहे. पण शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही. सध्या बाजारात ज्वारीला गुणवत्ता आणि वाणाप्रमाणे प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. ज्वारीच्या भावावरील दबाव कायम राहू शकतो, असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

Market Update
Soybean Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ४७८ केंद्रे

मक्याचा बाजार स्थिर

खरिपातील मक्याची आवक सुरु झाल्यानंतर मक्याच्या भावात नरमाई आली होती. पण मागील दोन आठवड्यांपासून मक्याचा बाजारभाव काहिसा स्थिरावला आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये सध्या बाजारभावात तफावत दिसून येत आहे. राज्यातील बाजारात मक्याला गुणवत्ता आणि ओलाव्यानुसार १ हजार ८०० ते २ हजार २०० रुपयांचा भाव मिळत आहे. मक्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे मक्याचा बाजार यंदा टिकून राहण्याचा अंदाज आहे, असे मका बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

हिरवी मिरची टिकून

राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीचे भाव टिकून आहेत. बाजारात हिरव्या मिरचीची आवक काहिशी वाढलेली दिसते. पण बाजारात मागणीही चांगली आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या पावसाचा मिरची पिकाला मोठा फटका बसला. त्यामुळे मिरचीला उठाव मिळत आहे. बाजारात मिरचीचे भाव सध्या ३ हजार ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढच्या काळात बाजारातील मिरची आवक काहिशी वाढू शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे मिरचीचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com