Agrowon Podcast : आल्याचे भाव नरमले; कापूस, सोयाबीन, तूर, तसेच काय आहेत हळदीचे दर

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, तूर, हळद आणि आले पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Market Update
Market UpdateAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin :

सोयाबीन बाजार निचांकी पातळीवर

आज दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा झाली. पण भाव आजही दबावातच आहेत. आज सोयाबीन दुपारपर्यंत वायद्यांमध्ये १०.१७ डाॅलर प्रतिबुशेल्सचा भाव मिळत होता. तर सोयापेंड ३१८ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातही सोयाबीन दबावातच असून सोयाबीनला आजही ४ हजार १०० ते ४ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसाचा उठाव कमीच

आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारातही कापसाचा भाव दबावातच आहे. कापसाला तसेच सुताला उठाव मिळत नसल्याने भाव कमी झाल्याचे सांगितले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाची विक्री वाढलेली आहे. आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे ६८.१४ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. देशातील बाजारातही सप्टेंबरचे वायदे ५६ हजार ८६० रुपये प्रतिखंडीवर होते. तर बाजार समित्यांमधील भाव ७ हजार ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Market Update
Agrowon Podcast : तुरीच्या भावात काहीशी नरमाई ; कापूस, सोयाबीन, ज्वारी, तसेच काय आहेत तूरीचे दर ?

हळदीचा बाजार नरमला

हळदीचा बाजार गेल्या काही दिवसांपासून स्थिरावला आहे. हळदीच्या भावावर वाढत्या लागवडीचा परिणाम होत आहे. त्यामुळे हळदीचा भाव उच्चांकापासून कमी होऊन स्थिरावलेला दिसतो. सध्या हळदीला सरासरी १२ हजार ते १५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. हळदीच्या भावातील नरमाई आणखी काही आठवडे राहू शकते. हळदीच्या भावात काहीसे चढ उतारही राहू शकतात, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Market Update
Papaya Market : खानदेशात पपईची अल्प आवक

तुरीमध्ये काहीशी नरमाई

देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात काही प्रमाणात चढ उतार सुरु झाले. आयात तुरीचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत. आजही देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहेत. याचा देशातील तुरीच्या भावालाही आधार मिळत आहे. सध्या तुरीला सरासरी १० हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहे. तुरीच्या बाजारातील तेजी कायम राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

आल्यातील चढ उतार कायम

आल्याच्या भावात मागील काही दिवसांपासून काहीशी नरमाई दिसून आली. नव्या हंगामात लागवडीसाठी आले बियाण्याला चांगली मागणी वाढली. याचा आधार आल्याच्या बाजाराला मिळत आहे. आल्याचे भाव देशातील बाजारात टिकून आहेत. बाजारातील आवक कमी असल्याने सध्या आल्याचे भाव सरासरी भावापातळी सध्या ५ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.     

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com