
Market Bulletin:
मुगाचे दर स्थिर
देशातील बाजारात सध्या मुगाची आवक काहीशी कमी झाली आहे. मात्र यंदा देशात मुगाचे उत्पादन आणि आयात वाढली आहे. त्याचा दबाव दरावर दिसून येत आहे. मुगाला उठाव असला तरी भावपातळी आजही हमीभावापेक्षा कमीच दिसत आहे. देशातील बाजारात सध्या मुगाला सरासरी प्रतिक्विंटल ६ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मुगाची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे दरावरही दबाव राहू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
गवारचे भाव टिकून
बाजारातील गवारची आवक कमीच आहे. तर गवारला चांगला उठाव आहे. त्यामुळे गवारचे भावही टिकून आहेत. राज्यातील सर्वच बाजारांमध्ये गवारची आवक मर्यादीत दिसत आहे. इतर भाजीपाल्याची आवक वाढली तरी गवार मात्र भाव राखून आहे. बाजारातील आवक आवक आजही कमीच होती. त्यामुळे बाजारात गवारला ५ हजार ते ६ हजारांच्या दरम्यान सरासरी भाव मिळाला. तर पुढील काही आठवडे गवारची आवक सरासरीच काहील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहे. त्यामुळे दरही टिकून राहतील, असा अंदाज आहे.
गहू दर नरमले
बाजारात नव्या गव्हाची आवक सुरु झाली. देशातील अनेक राज्यांमध्ये नवा गहू विक्रीसाठी येत आहे. तसेच आवकेचा दबाव पुढील दोन आठवड्यांमध्ये वाढायला सुरुवात होईल. पण बाजारातील नव्या मालाची सुरु झालेली आवक आणि सरकारची गहू विक्री यामुळे गव्हाच्या बाजारात काहीशी नरमाई पाहायला मिळाली. आज देशातील बाजरात गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ६०० ते २ हजार ७०० रुपये भाव मिळाला. पुढील दोन आठवड्यांमध्ये आवक वाढल्यानंतर दरात आणखी नरमाई येऊ शकते, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
सोयाबीन दबावातच
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात काहीशी नरमाई आली होती. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १०.१७ डाॅलरवर होते तर सोयापेंड ३०२ डाॅलरवर होते. देशात मात्र सोयाबीनची दरपातळी आजही स्थिर होती. सोयाबीनची बाजारातील आवक काहीशी कमी झाली होती. प्रक्रिया प्लांट्सचे भाव आजही आजही ४ हजार ५० ते ४ हजार १५० रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजारात सोयाबीन ३ हजार ७०० ते ३ हजार ८०० रुपयांनी विकले गेले. सोयाबीन बाजारातील ही स्थिती काही आठवडे कायम राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
कापूस दबावातच
देशात कापसाचा बाजार दबावातच आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्री बाजारात आज दुपारपर्यंत कालच्या तुलनेत नरमाई आली होती. देशातील कापसाची बाजारातील आवक आजही काहीशी स्थिर होती. तर बाजारात कापसाला सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार १०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. बाजारातील कापसाची आवक पुढच्या काळात कमी होत जाईल,असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.