Agrowon Podcast: हरभऱ्याच्या भावात नरमाई; तूर, लसूण, कापूस तसेच काय आहेत आजचे सोयाबीन भाव?

Daily Commodity Rates: राज्यातील तूर, हरभरा, लसूण, सोयाबीन आणि कापूस बाजार सध्या दबावात असून, वाढती आवक आणि आयातीच्या धोरणातील अनिश्चिततेमुळे दर नरमले आहेत. शेतकऱ्यांसाठी आगामी काळ महत्त्वाचा ठरणार असून, बाजारातील स्थितीवर अभ्यासकांचे लक्ष आहे.
Market Update
Market UpdateAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin:

तूर बाजार दबावात

राज्यासह देशातील बाजारात सध्या तुरीची आवक वाढत आहे. तसेच कडधान्य आयातीविषयी सरकारचे धोरण अनिश्चित आहे. त्याचाही दबाव बाजारावर दिसत आहे. तुरीची बाजारातील आवक वाढ असल्याने दरातही काहीसे चढ उतार सुरु आहेत. सध्या तुरीला सरासरी ६ हजार ७०० हजार ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान गुणवत्ता आणि वाणानुसार भाव मिळत आहे. बाजारातील आवक पुढच्या काळात आणखी वाढणार आहे. त्यामुळे तुरीचा बाजार काही आठवडे तरी हमीभावाच्या खाली राहू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

हरभरा दबावात

पिवळा वाटाणा आयातीच्या धोरणातील अनिश्चितता आणि देशातील बाजारात नव्या मालाची वाढती आवक, यामुळे हरभरा भाव दबावात आले आहेत. बाजार समित्यांमध्ये हळूहळू आवकही सुधारत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. आज बाजारात हरभरा ५ हजार १०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान हरभरा विकला गेला. बाजारातील आवक होळीनंतर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात पुढील दीड ते दोन महीने आवकेचा दबाव राहू शकतो. या काळात हरभरा बाजारावरील दबावही कायम राहील, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Market Update
Soybean Bhavantar: सोयाबीनसाठी भावांतर योजना राबवा, खरेदी १० दिवसांसाठी सुरु करा : रणधीर सावरकर

लसणामध्ये नरमाई

नव्या लसणाची बाजारातील आवक वाढली आहे. त्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. देशभरात लसणाचे भाव पुन्हा कमी झाले. महाराष्ट्रासोबतच मध्य प्रदेशातील बाजारांमध्ये लसूण आवक वाढली. सध्या मालामध्ये ओलावा देखील जास्त आहे. त्याचाही परिणाम दरावर होत आहे. त्यामुळे मागील दोन-तीन आठवड्यांमध्ये लसूण पुन्हा ३ हजार रुपयांपर्यंत कमी झाला. सध्या बाजारात लसणाला ४ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्ता आणि वाणाप्रमाणे भाव मिळत आहे. बाजारात लसूण आवकेचा दबाव आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरावरही दबाव राहील, असा अंदाज लसूण बाजारातील व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत.

Market Update
Onion Bhavantar, MSP : कांद्याला २२५० रुपये हमीभाव द्या; कांद्यासाठी भावांतर योजना राबवा : छगन भुजबळ, रोहीत पवारांची मागणी

सोयाबीन दबावातच

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात काहीशी नरमाई आली होती. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १०.२१ डाॅलरवर होते तर सोयापेंड ३०४ डाॅलरवर होते. देशात मात्र सोयाबीनची दरपातळी आजही स्थिर होती. सोयाबीनची बाजारातील आवक काहीशी कमी झाली होती. प्रक्रिया प्लांट्सचे भाव आजही आजही ४ हजार ५० ते ४ हजार १५० रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजारात सोयाबीन ३ हजार ७०० ते ३ हजार ८०० रुपयांनी विकले गेले. सोयाबीन बाजारातील ही स्थिती काही आठवडे कायम राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापूस दबावातच

देशात कापसाचा बाजार दबावातच आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत शुक्रवारच्या तुलनेत सुधारणा झाली होती. देशातील कापसाची बाजारातील आवक आजही काहीशी स्थिर होती. तर बाजारात कापसाला सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार १०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. बाजारातील कापसाची आवक पुढच्या काळात कमी होत जाईल,असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com