Agrowon Podcast : बाजारात सोयाबीन भावात ५० रुपयांची वाढ

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि कापसाच्या भावात सुधारणा दिसून आली. तर काही शेतमालाच्या भावात नरमाई आली
Market Bulletin
Market Bulletin Agrowon
Published on
Updated on

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात आज काहिशी सुधारणा झाली होती. तर देशातील बाजारातही सोयाबीनच्या भावात वाढ झाली होती. सोयाबीनचे वायदे आज प्रतिबुशेल्स १३.७७ डाॅलरपर्यंत पोचले होते. तर सोयापेंडच्या वायद्यांनी ४६६ डाॅलरचा टप्पा गाठला होता. तर देशातील बाजारातही आज सोयाबीन भावात ५० रुपयांची वाढ झाली. सोयाबीनला आजही ४ हजार ९०० ते ५ हजार १०० रुपयांचा भाव मिळाला. तर बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. आजही गाव खेड्यात शेतकरी भाववाढीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे बाजारातील आवक कमी दिसते. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील दरासोबत देशातही चढ उतार होत आहेत, असे अभ्यासकांनी सांगितले.

Market Bulletin
Agrowon Podcast : राज्यातील बाजारात कांदा भावात काहिशी सुधारणा

देशातील बाजारात कापसाच्या भावात सुधारणा झाली. दिवाळीनंतर अनेक बाजारांमध्ये कापसाच्या खेरदी विक्रीला सुरुवात झाली. तर अनेक जिनिंगचे व्यवहार सुरु झाले आहेत. त्यामुळे कापसाला काहिसा उठाव वाढला. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाच्या भावात वाढ झाली. कापसाचे वायदे आज ८०.३० सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशात कापसाला सरासरी ७ हजार ते ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. यंदा देशातील कापूस उत्पादनात मोठी घट झाली. तसेच अनेक शेतकरी आता चांगल्या भावाच्या अपेक्षेने कापूस विक्री कमी करत आहेत. यंदा कापसाचा वापर मात्र कायम कायम राहणार आहे. त्यामुळे कापसाच्या भावाला चांगला आधार मिळू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Market Bulletin
Agrowon Podcast : गव्हाच्या भावात काहीशी सुधारणा

आल्याच्या भावात मागल काही दिवसांपासून नरमाई आली आहे. आल्याची बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. पण वाढलेल्या भावात आल्याचा उठाव कमी झाला होता. तसेच नवा माल बाजारात पुढील एक ते दीड महिन्यात सुरु होईल. नवा माल बाजारात येण्याच्या आत मागील माल विकण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच नफावसुलीसाठी आल्याची विक्री झाली. त्यामुळे आल्याचे भाव आता ७ हजार ते ९ हजारांच्या दरम्यान आले. यंदा नव्या आले पिकाला कमी पावसाचा फटका बसला. तसेच बदलत्या वातावरणाचाही फटका आले पिकाला बसत आहे. परिणामी आल्याचे उत्पादन यंदाही कमी राहू शकते, असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

बाजारातील आवक कमी असल्याने मागील काही महिन्यांपासून गवारला चांगला भाव मिळत आहे. बाजारात गवारची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. मागील तीन महिन्यांपासून बाजारात मागणीच्या तुलनेत गवारचा पुरवठा कमी झालेला आहे. परिणामी गवारच्या भावाला आधार मिळतोय. दुसरीकडे यंदा कमी पाऊस आणि पावसातील मोठ्या खंडाचाही फटका गवार पिकाला बसत आहे. राज्याच्या सर्वच भावात ही परिस्थिती असल्याने पुरवठा कमीच दिसतो. परिणामी गवारला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ते ५ हजारांचा भाव मिळत आहे. यापुढील काळातही बाजारातील गवारची आवक जास्त वाढण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे गवारचे भाव तेजीतच राहू शकतात, असा अंदाज गवार बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ज्वारीचा भाव मागील काही महिन्यांपासून टिकून आहे. खरिपातील ज्वारीचे उत्पादन यंदा घटले. खरिपातील पिकाला यंदा कमी पाऊस आणि पावसात जास्त दिवसाच्या खंडाचा फटका बसला. सध्या बाजारात मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने ज्वारीला वाण आणि गुवणत्तेप्रमाणे ३ हजार ते ५ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. यंदा रब्बी हंगामातील पिकाविषयीची चिंता वाढली आहे. कारण यंदा माॅन्सून हंगामात पाऊस पडल्याने रब्बीच्या पेरणीसाठी पोषक हवामान नाही. काही भागात तर जमिनित ओलावा नसल्याने पेरण्या होऊ शकल्या नाहीत. यामुळे रब्बीतील उत्पादनही कमची राहण्याचा अंदाज आहे. म्हणजेच यंदाही ज्वारीचा पुरवठा मागणीपेक्षा कमीच राहू शकतो. परिणामी ज्वारीच्या भावाला चांगला आधार मिळू शकतो, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com