Agrowon Podcast : मुगाचे दर दबावात; कापूस आणि सोयाबीनचे आजचे बाजारभाव जाणून घ्या

Moong Rate : देशातील बाजारात सध्या मुगाची आवक काहीशी कमी झाली आहे. मात्र यंदा देशात मुगाचे उत्पादन आणि आयात वाढली आहे. त्याचा दबाव दरावर दिसून येत आहे.
Moong Market
Moong MarketAgrowon
Published on
Updated on

सोयाबीनमध्ये चढ उतार

जागतिक आणि अमेरिकेच्या सोयाबीन उत्पादनात घटीचा अंदाज युएसडीएने दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाच्या भावात सुधारणा झाली होती. सीबाॅटवर आजही सोयाबीनचे भाव वाढले होते. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत १०.३७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. तर सोयापेंड ३०२ डाॅलर प्रतिटनांवर होते.

सोयातेलही ४६ सेंट प्रतिपाऊंडवर होते. देशातील बाजारात मात्र चढ उतार सुरुच आहेत. आज प्रक्रिया प्लांट्सनी खेरदीचे भाव ४ हजार ४०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. बाजार समित्यांमधील दरपातळी मात्र ३ हजार ९०० ४ हजार १०० रुपयांच्या दरम्यान होती. सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार येऊ शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कांदा भाव पुन्हा नरमले

कांद्याच्या भावात मागील दोन-तीन दिवसांमध्ये काहीशी नरमाई दिसून आली. कांद्याचा बाजार गेले ३ आठवडे २ हजारांच्या दरम्यान स्थिर होता. बाजारातील आवकही स्थिरावली होती. पण गेले ३ दिवस बाजारात आवक काहीशी सुधारली होती.

खरिप कांद्याची काढणी आता जोर धरत असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. आज बाजारात कांद्याला सरासरी १ हजार ५०० ते २ हजारांच्या दरम्यान भाव मिळाला. कांद्याची आवक पुढील काही दिवसांमध्ये आणखी वाढेल आणि याचा दबाव दरावर दिसू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

गवारचे भाव टिकून

गवारच्या भावात काहीसे चढ उतार पाहायला मिळाले असले तरी सरासरी दरपातळी कायम दिसत आहे. बाजारातील गवारची आवक मागणीच्या तुलनेत कमीच आहे. त्यामुळे गवारला मागील काही महिन्यांपासून तेजीतच दिसत आहेत.

बाजारातील आवक आवक आजही कमीच होती. त्यामुळे बाजारात गवारला ५ हजार ते ६ हजारांच्या दरम्यान सरासरी भाव मिळाला. तर पुढील काही आठवडे गवारची आवक सरासरीच काहील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहे. त्यामुळे दरही टिकून राहतील, असा अंदाज आहे.

Moong Market
Cotton Procurement : ‘सीसीआय’च्या कापूस खरेदीला पुसदमध्ये ब्रेक

बाजरीला चांगली मागणी

बाजरीला थंडीमुळे सध्या काहीशी चांगली मागणी आहे. तर बाजारातील बाजरीची आवक स्थिरावली आहे. यंदाच्या खरिपात बाजारीचे उत्पादन वाढील्याचे अंदाज आहेत. मात्र बाजारीला उठावही चांगला मिळत आहे.

त्यामुळे बाजारीचे भाव मागील ३ आठवड्यांमध्ये अनेक बाजारांमध्ये काहीसे सुधारले. आता बहुतांशी बाजारात बाजरीला २५०० रुपयांच्या पुढे दर मिळत आहे. तर सरासरी दरपातळी २ हजार ५०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान होती. रब्बीतील बाजारीची आवक सुरु होईपर्यंत बाजारीचा बाजार टिकून राहू शकतो, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.

Moong Market
Soybean Procurement Stopped : सोयाबीनची खरेदी थांबवली की मुदतवाढ देणार? सोयाबीन खरेदीवरून संभ्रम कायम

मुगाचा बाजार दबावात

देशातील बाजारात सध्या मुगाची आवक काहीशी कमी झाली आहे. मात्र यंदा देशात मुगाचे उत्पादन आणि आयात वाढली आहे. त्याचा दबाव दरावर दिसून येत आहे. मुगाला उठाव असला तरी भावपातळी आजही हमीभावापेक्षा कमीच दिसत आहे.

देशातील बाजारात सध्या मुगाला सरासरी प्रतिक्विंटल ६ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मुगाची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे दरावरही दबाव राहू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापूस दबावातच

सोयाबीनच्या भावावरील दबाव आजही कायम होता. आंतरराष्ट्रीय बाजारात आजही कापसाचे वायदे ६७ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर काॅटलूक ए इंडिक्स म्हणजेच हजर बाजारातील कच्च्या कापसाच्या भावाची सरासरी ७८.७० सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. देशातील बाजारातही कापसाची आवक कायम आहे.

त्यामुळे देशातील बाजारात सध्या कापसाचा सरासरी भाव ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहे. देशातील बाजारावर सध्या आवकेचा आणि कमी उठाव, या घटाकांचा दबाव आहे. जानेवारीतही देशातील बाजारात कापसाची आवक चांगली राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरपातळीही स्थिर राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com