Soybean Moong Urad Registration : सोयाबीन, मूग, उडीद हमीभाव खरेदी ऑनलाईन नोंदणीस मुदतवाढ; शेतकऱ्यांच्या मागणीला यश

Soybean, Moong, Urad Guaranteed Price Purchase : राज्यातील सोयाबीन, मूग, उडीद हमीभाव खरेदी ऑनलाईन नोंदणीस राज्य सरकारने ३१ डिसेंबर, २०२४ पर्यंत मुदत वाढ दिली आहे.
Soybean Rate
Soybean RateAgrowon
Published on
Updated on

Pune News : सोयाबीन, मूग, उडदाच्या हमीभावाने होणाऱ्या खरेदीला राज्य सरकारने मुदत वाढ दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे आदेश दिले असून राज्यातील शेतकऱ्यांनी मागणी केली होती. तसेच याचमुद्द्यावरून राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटले यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मुदत वाढ देण्याची मागणी केली होती. आता सोयाबीन, मूग, उडीद हमीभाव खरेदी ऑनलाईन नोंदणीस ३१ डिसेंबर, २०२४ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत हमीभावाने शेतमाल खरेदीचा मुद्द्या चांगलाच गाजला होता. तर प्रचारादरम्यान भाजपसह सर्वच पक्षांनी आमचे सरकार आल्यास शेतमालाची खरेदी हमीभावाने केली जाईल, असे आस्वासन दिले होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हमीभाव वाढून देण्याची घोषणा करताना १२ टक्के ऐवजी १५ टक्के ओलावा असणारे सोयाबीन खरेदी केले जाईल, अशी ग्वाही दिली होती. आता याचा केंद्रात निर्णय झाला आहे. मात्र राज्यात निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. ज्याचा फटका राज्यातील सोयाबीन उत्पादकांना बसत आहे.

Soybean Rate
Soybean Rate Down: सोयाबीनचे भाव पुन्हा १०० रुपयांनी कमी झाले; हमीभावाने खरेदी फक्त स्टंटबाजी

दरम्यान यावरून दोनच दिवसांपूर्वी राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ओलाव्याचा मुद्दा मांडला होता. तसेच शेतकऱ्यांच्या रोषाबद्दल माहिती दिली होती. यानंतर आता राज्याच्या पणन आणि सरकार विभागाने गुरूवारी याबाबत आदेश काढले आहेत. याबाबतचे आदेश सहकार विभागाच्या अपर सचिव संगीता शेळके यांनी निर्गमित केला आहे.

पणन आणि सरकार विभागाने आदेश काढताना याआधी सोयाबीन, मूग, उडीद हमीभाव खरेदी ऑनलाईन नोंदणीस १५ डिसेंबर, २०२४ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. ती मुदत आता ३१ डिसेंबर, २०२४ पर्यंत वाढवण्यात येत आहे. यामुळे राज्यातील संबंधित संस्थांनी सोयाबीन, मूग, उडीद हमीभाव खरेदी ऑनलाईन नोंदणी ३१ डिसेंबर चालू ठेवावी आणि खेरदी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

Soybean Rate
Soyabean Rate : 'राज्यातील सोयाबीनला हवा तसा भाव मिळेल', पाशा पटेल यांचे आश्वासन

दरम्यान बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यात २ पेक्षा अधिक सोयाबीन हमीभाव केंद्र असून या केंद्रावर शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात हमीभावाने सोयाबीन विक्री होत आहे. कालच विक्री मर्यादा वाढविण्यात आलेली असून आता हेक्टरी २१.५ क्विंटल पर्यंत सोयाबीन विक्री खरेदी केंद्रावर करता येणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ऑनलाईन नोंदणी केलेली नाही त्यांनी आता ३१ डिसेंबर पर्यंत नोंदणी करावी. तसेच सोयाबीन, मूग, उडीद हमीभाव खरेदी केंद्रावरच विक्री करावी, असे आवाहन बीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय गुंदेकर यांनी केले आहे.

केंद्र सरकारने १५% पर्यंत मॉईश्चर आदेश दिलेला असताना देखील अद्याप खरेदी केंद्रांना तसा आदेश दिलेला नाही. तो निर्णय प्रलंबित असून शेतकऱ्यांना या निर्णयामुळे अडचणी येत आहेत. याबाबतही राज्य सरकारने योग्य निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
- धनंजय गुंदेकर, संचालक. कृषी उत्पन्न बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com