Agrowon Podcast: लसणाच्या दरात सुधारणा; हळद, पांढरा वाटाणा, कांदा तसेच काय आहेत आजचे हिरव्या मिरचीचे दर?

Daily Commodity Rates: आज आपण हळद, पांढरा वाटाणा, कांदा, हिरवी मिरची आणि लसूण बाजाराची माहिती घेणार आहोत.
Agriculture Products
Agriculture ProductsAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin:

हळद स्थिरावली

हळदीचे दर बाजारात मागील काही आठवड्यांपासून स्थिरावले आहेत. हळदीला लग्न सराईमुळे मागणी आहे. तसेच बाजारातील हळदीची आवकही मंदावली आहे. हळदीची लागवडही सुरु होणार आहे. त्यामुळे बाजाराचे लक्ष हळदीची लागवड आणि पाऊस याकडे आहे. सध्या बाजारात हळद १२ हजार ते १३ हजार रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. पुढील काही आठवडे हळदीच्या भावात काहीसे चढ उतार दिसू शकतात. देशातील लागवडीचे चित्र स्पष्ट होऊन सणांची मागणी वाढल्यानंतर दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

पांढरा वाटाणा टिकून

पांढरा वाटाण्याला मागणी चांगली आहे. तर बाजारातील आवक स्थिर आहे. त्यामुळे पांढऱ्या वाटाण्याचे भावही टिकून आहेत. मागील काही आठवड्यांपासून पांढऱ्या वाटाण्याच्या भावात काहीसे चढ उतार सुरु होते. मात्र दोन आठवड्यांपासून दर ११ हजार ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहेत. पांढऱ्या वाटाण्याला मागणीही चांगली असल्याचे व्यापारी सांगत आहेत. पांढरा वाटाण्याची बाजारातील आवक पुढील काळातही मर्यादीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Agriculture Products
Soybean MSP 2025: सोयाबीनला ५३२८ हमीभाव

कांद्यात चढ उतार

पावसाने वाढलेले नुकसान आणि बाजारातील कमी आवक यामुळे मधल्या काळात कांद्याच्या भावात काहीशी सुधारणा दिसून आली होती. मात्र मागील दोन आठवड्यापासून कांद्याचे भाव पुन्हा स्थिरावले आहेत. कांद्याचा भाव बहुतांशी बाजारांमध्ये सध्या सरासरी ११०० ते १३०० रुपयांच्या दरम्यान दिसत आहे. उचांकी भाव १५०० रुपयांच्या दरम्यान आहे. अनेक भागात कांदा पावसाच्या पाण्यात भीजला. कांदा खराबही होत आहे. हा कांदा पुढील काही आठवडे बाजारात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांद्याच्या दरातही काहीसे चढ उतरा राहू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Agriculture Products
Agrowon Podcast: हरभरा दर टिकून; टोमॅटो, दोडका, मका, गहू तसेच काय आहेत आजचे भाव?

हिरव्या मिरची स्थिर

राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून हिरव्या मिरचीची आवक कमीच आहे. तर दुसरीकडे मागणी आहे. त्यामुळे दरही स्थिर दिसत आहेत. सध्या लग्न सराई आणि समारंभामुळे हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे. त्यामुळे हिरवी मिरची ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयाने विकली जात आहे. हिरव्या मिरचीची आवक आणखी काही आठवडे वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळे बाजारातील आवकही सरासरी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीचे दरही पुढील काही आठवडे कायम राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

लसणाच्या दरात सुधारणा

लसणाच्या बाजारात मागील काही दिवसांपासून सुधारणा दिसून आली. बाजारतील लसणाची आवक वाढलेल्या पावासामुळे कमी झाली होती. मात्र लग्नसराई आणि समारंभामुळे लसणाला उठाव चांगला होता. त्यामुळे लसणाच्या भावात दोन आठवड्यांमध्ये सरासरी ५०० ते १ हजार रुपयांची वाढ दिसून आली. लसणाचे भाव राज्यातील बहुतांशी बाजारांमध्ये सध्या ७ हजार ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान होते. लसणाची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कायम राहू शकते. तसेच त्यानंतर आवक कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com