
Market Bulletin:
टोमॅटो दर तेजीत
टोमॅटो दरातील तेजी आजही टिकून होती. तोडणीला आलेला टोमॅटोचे सततच्या पावसाने नुकसान झाले. यामुळे बाजारातील टोमॅटो आवकही कमी होत आहे. त्यामुळे टोमॅटोच्या भावत सुधारणा दिसून येत आहे. गुणवत्तापूर्ण टोमॅटो अनेक बाजारात २५०० रुपयांपर्यंत विकला जात आहे. तर सरासरी दरपातळी २ हजार रुपयांवर पोचली आहे. यापुढील काळातही टोमॅटोची आवक कमी होणार आहे. त्यामुळे दरातही सुधारणा दिसू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
दोडका आवक घटली
बाजारीत दोडक्याची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली. तर दोडक्याला चांगला उठाव आहे. त्यामुळे दोडक्याच्या भावातही सुधारणा दिसून आली. दोडका पिकालाही सततचा पाऊस आणि ढगाळ हवामानाचा फटका बसत आहे. पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. आवक कमी आणि चांगली मागणी यामुळे दोडक्याचा बाजार ४ हजार ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान पोचला. दोडक्याची आवक आणखी काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरही टिकून राहतील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
हरभरा दर टिकून
देशातील बाजारात हरभरा दर दबावातच आहेत. हरभऱ्याला मागील काही आठवड्यांपासून उठाव चांगला आहे. लग्न समारंभामुळे हरभऱ्याला मागणी आहे. मात्र देशातील बाजारातील आवक आणि वाढती आयातीचा दबावर दबाव आहे. त्यामुळे हरभऱ्याचे दर एकाच पातळीवर टिकून आहेत. हरभऱ्याला देशातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. हरभऱ्याची देशातील बाजारातील आवक पुढील काळात कमी होणार आहे. मात्र आयात कायम राहील. त्यामुळे दरात काहीसे चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
मका दर स्थिर
मक्याचा बाजार मागील दोन आठवड्यांपासून स्थिर दिसत आहे. बहुतांशी बाजारातील दरपातळी टिकून आहे. बाजारामध्ये सध्या रब्बीचा मका विक्रीसाठी येत आहे. यंत्यामुळे मक्याच्या दरावर काहीसा दबाव आला. सध्या मक्याला बाजारात सरासरी २ हजार ते २ हजार ३०० रुपयांच्या भाव मिळत आहे. महत्वाच्या रब्बी मका उत्पादक भागातील आवक चांगली आहे. मक्याची बाजारातील आवक आणखी काही आठवडे टिकून राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे काही आठवडे मक्याच्या भावात काहीसे चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
गव्हाचा भाव टिकून
बाजारात सध्या गव्हाची आवक चांगली सुरु आहे. पण सरकार हमीभावाने खरेदी करत आहे. मध्य प्रदेश बोनसही देत आहे. तर दुसरीकडे गहू उत्पादनात अपेक्षित वाढ होण्याची शक्यता नाही. त्यामुळे गहू दराला आधार आहे. एप्रिलपासून बाजारातील आवक वाढल्यानंतरही गव्हाचे दर हमीभावापेक्षा जास्त आहेत. सध्या गहू २ हजार ५०० ते २ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. मे महिन्यात बाजारातील आवक कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे गव्हाच्या भावातही वाढ होऊ शकते, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.