Onion Rate: कांद्याचे भाव मे महिन्यापर्यंत कसे राहतील? नाफेडच्या खरेदीचा फायदा होईल का?

Market Update: देशातील बाजारात सध्या कांद्याचे भाव कमी झालेले आहेत. मात्र पुढील काही दिवसांमध्ये बाजारातील लाल कांद्याची आवक कमी होण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे नाफेडही खरेदीत उतरणार आहे.
Onion Market
Onion RateAgrowon
Published on
Updated on

Pune News: देशातील बाजारात सध्या कांद्याचे भाव कमी झालेले आहेत. मात्र पुढील काही दिवसांमध्ये बाजारातील लाल कांद्याची आवक कमी होण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे नाफेडही खरेदीत उतरणार आहे. या दोन्ही कारणांमुळे कांद्याच्या दराला आधार मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांद्याचे पॅनिक सेलिंग न करता टप्प्याटप्प्याने विक्री करावी, असे आवाहन कांदा बाजारातील अभ्यासकांनी केले आहे. 

Onion Market
Onion Cultivation: अहिल्यानगरला कांदा लागवड क्षेत्रात ६४ हजार हेक्टरने वाढ

देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून कांद्याचे भाव कमी झाले आहेत. बाजारात लाल कांदा आणि उन्हाळ कांदा येत असल्यामुळे आवक वाढली. याचा परिणाम दरावर दिसून आला. मार्चच्या सुरुवातीला १५०० ते १८०० रुपयांच्या दरम्यान असलेला भाव किमान ४०० ते ५०० रुपयांनी कमी झालेला दिसतो. सध्या बाजारात कांदा ११०० ते १४०० रुपयांनी विकला जात आहे. बाजारातील बदलत्या आवकेनुसार दरातही १०० ते १५० रुपयांचे चढ उतार दिसत आहेत. पण मागील तीन आठवड्यांपासून कांदा मार्केट या पातळीच्या दरम्यान दिसत आहे. 

उन्हाळ कांद्याची लागवड वाढल्याचे अंदाज व्यक्त केले जात आहे. मात्र कांदा पिकाचे नुकसान झाल्यामुळे उत्पादनात तेवढी वाढ होण्याची शक्यता नसल्याचे शेतकरी आणि व्यापारी सांगत आहेत. यंदा वाढलेली उष्णता आणि बदलते वातावरणामुळे उतारा नसल्याचेही शेतकरी सांगत आहेत. म्हणजेच लागवड वाढल्याच्या बातम्यान आल्यानंतर उत्पादनात जेवढी वाढ अपेक्षित होती, त्यापेक्षा उत्पादन कमीच होणार आहे. सध्याची आवकही उत्पादन चांगले असलेल्या वर्षात ज्या पातळीवर होते त्या पातळीपेक्षा कमीच आहे. 

Onion Market
Onion Market : कांद्याचे पैसे थकविल्याने शेतकरी संतप्त

बाजारात उन्हाळ कांदा येत असला तरी लाल कांद्याचीही आवक सुरु आहे. मागील महिन्याच्या तुलनेत ही आवक कमी झाली. मात्र आवकेचा दबाव दरावरही दिसून येत आहे. आता पुढील २ आठवड्यांमध्ये लाल कांद्याची आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. मे महिन्यात मध्यानंतर बाजारात उन्हाळ कांद्याचीच आवक दिसेल. त्यामुळे दराला याचा आधार मिळेल. तसेच नाफेडही बाजारात कांदा खेरदीत उतरणार आहे. नाफेडने कांदा खरेदी सुरु केल्यास दराला आधार मिळेल. त्यातही नाफेड कांदा खरेदीचा भाव काय काढते? हेही महत्वाचे असेल. 

एप्रिल मे महिन्यातील दराचे अंदाज

एकंदरीतच एप्रिल महिन्यात बाजारात कांदा आवकेमुळे दरात फार मोठ्या सुधारणेची शक्यता दिसत नाही. सध्याच्या दरपातळीत १०० रुपयांपर्यंत चढ उतार दिसू शकतात. मात्र मे महिन्यात लाल कांद्याची आवक कमी होऊन नाफेडची खरेदी सुरु झाल्यानंतर दराला आधार मिळू शकतो. कांदा दरात मे महिन्यात ३०० ते ५०० रुपयांपर्यंत सुधारणा अपेक्षित असल्याचे कांदा बाजारातील अभ्यासकांनी सांगितले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com