Agrowon Podcast: लिंबाला चांगला उठाव; तीळ, काकडी, आले तसेच काय आहेत सोयाबीन भाव?

Daily Commodity Rates: आज आपण काकडी, तीळ, लिंबू, आले आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत.
Agriculture Product
Agriculture ProductAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin:

काकडीचा भाव टिकून

वाढत्या उन्हामुळे सध्या काकडीला चांगला उठाव मिळत आहे. बाजारातील काकडीची आवकही स्थिर दिसत आहे. त्यामुळे काकडे भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिर दिसत आहेत. राज्याच्या वेगवेगळ्या भागात काकडीला सध्या १ हजार १०० ते १ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. काकडीची आवक पुढील काही आठवडे कायम राहील. त्यानंतर आवकेत घट येऊन दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यापारी आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

Agriculture Product
Watermelon Price Drop: पांढरकवडा तालुक्यात कलिंगडदर दबावात

तीळ नरमले

बाजारातील वाढत्या आवकेबरबोर तिळाच्या भावातही नरमाई दिसून आली. तिळाला देशातील बहुतांशी बाजारात चांगला उठाव आहे. असे असतानाही आवकेच्या दबावाबरोबर दरावरही दबाव दिसून येत आहे. बाजारात सध्या तिळाला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ते १२ हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे दर मिळत आहेत. बाजारातील तिळाची आवक पुढील काही आवड्यांमध्ये कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरात सुधारणाही होऊ शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

लिंबू दर तेजीतच

लिंबाला सध्या चांगली मागणी आहे. मात्र बाजारातील लिंबाची आवक कमी आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून लिंबाचे भाव टिकून आहेत. वाढते ऊन आणि लग्न सराईमुळे लिंबाला मागणी आहे. पण वाढत्या उन्हाचा उत्पादनाला फटका बसत आहे. त्यामुळे बाजारात सध्या लिंबाला ७ हजार ते ९ हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर किरकोळ बाजारात लिंबाला यापेक्षा अधिक दर मिळत आहे. बाजारातील लिंबू आवक पुढील काळात वाढत्या उन्हामुळे पुन्हा कमी होत होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे लिंबुचे दर तेजीतच राहतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

Agriculture Product
Tur Procurement : चुकाऱ्याअभावी नाफेडची तूर खरेदी मंदावली

आले दर दबावातच

राज्यातील सर्वच बाजारांमध्ये आल्याची आवक वाढली आहे. त्याचा परिणाम आल्याच्या दरावर दिसून येत आहे. सध्या आल्याला उठाव असला तरी वाढत्या आवकेमुळे आल्याचे भाव मागील दोन महिन्यात निम्म्यापेक्षा कमी झाले आहेत. सध्या बाजारात आल्याला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते ३ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. यंदा आल्याच्या उत्पादनात वाढल्याचेही शेतकरी आणि व्यापारी सांगत आहेत. आल्याची बाजारातील आवक काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरातही काहीसे चढ उतार दिसतील, असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

सोयाबीन दबावातच

एप्रिल महिन्यात बाजारातील सोयाबीनची आवक कमी झाली. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि देशात कमी उठाव यामुळे दरावर दबाव आहे. दुसरीकडे नाफेडही हमीभावाने खेरदी केलेल्या सोयाबीनची विक्री करत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनची आवक कमी असली तरी बाजारात नाफेडचे सोयाबीन उपलब्ध होत आहे. यामुळे सोयाबीनचा भाव ४ हजार ते ४ हजार २०० रुपयांच्या दरम्यान दिसत आहे. नाफेडची विक्री सुरुच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सोयाबीनच्या बाजारावरील दबावही कायम राहील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com