Tur Procurement : चुकाऱ्याअभावी नाफेडची तूर खरेदी मंदावली

Tur Market Update : शासनाने नाफेडच्या माध्यमातून हरभरा व तुरीची हमीदराने शासकीय खरेदी प्रारंभ केली आहे. मात्र दोन्ही शेतीमालाची खरेदी रखडली असल्याचे चित्र सध्या शासकीय केंद्रांवर आहे.
Tur Procurement
Tur ProcurementAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : शासनाने नाफेडच्या माध्यमातून हरभरा व तुरीची हमीदराने शासकीय खरेदी प्रारंभ केली आहे. मात्र दोन्ही शेतीमालाची खरेदी रखडली असल्याचे चित्र सध्या शासकीय केंद्रांवर आहे. हरभरा खरेदी अद्याप सुरूच होऊ शकलेली नाही. तर तूर विक्रीसाठी केंद्रांवर शेतकरीच येत नसल्याने संथगतीने खरेदी सुरू आहे. यामागे ‘नाफेड’कडून चुकारे रखडल्याचे कारण देण्यात आले.

खुल्या बाजारात तुरीला कमी भाव मिळत असल्याने शासनाने तुरीची नाफेडमार्फत हमीदराने शासकीय खरेदी सुरू करण्याचा निर्णय घेतला. आधी खरेदीचे निकष निश्चित होत नसल्याने खरेदी प्रक्रियेस विलंब झाला. त्यानंतर निकष निश्चित झाल्यानंतर जिल्ह्याच्या उत्पादन सरासरीवर पंचवीस टक्के तूर खरेदीचे सूत्र निश्चित झाले.

त्यानुसार अमरावती जिल्ह्यासाठी ३९ हजार ६५४ टन खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी व नंतर खरेदी प्रारंभ करण्यात आली. आतापर्यंत जिल्हा मार्केटिंगकडे ३८३८ व विदर्भ मार्केटिंगकडे ५५६०, अशा एकूण ९ हजार ३९७ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. यापैकी २ हजार ८५८ शेतकऱ्यांची तूर हमीदराने खरेदी झाली. ६ हजार ५३९ शेतकऱ्यांची तूर अद्याप शिल्लक आहे.

ज्या शेतकऱ्यांनी नाफेडला तूर विकली त्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना अद्याप चुकारे मिळाले नसल्याने नाराजी निर्माण झाली आहे. या नाराजीतूनच नाफेडकडे चुकाऱ्यास विलंब होतो, या समजुतीने शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात नगदी चुकाऱ्यासाठी धाव घेतली. मंगळवारी येथील बाजार समितीत २ हजार ७२८ पोत्यांची आवक नोंदविण्यात आली.

Tur Procurement
Tur Procurement : तुरीचे दोन कोटी ३ लाख रुपयांवर चुकारे अदा

ऑनलाइन नोंदणी झालेले शेतकरी संदेश दिल्यानंतरही केंद्रांवर तूर विक्रीसाठी येत नसल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे खुल्या बाजारात हमीदराच्या तुलनेत ५७५ ते सहाशे रुपये सरासरी दर कमी मिळत आहे. शासनाने तुरीला ७ हजार ५५० रुपये प्रति क्विंटलला दर दिला आहे.

हरभऱ्याची नुसतीच नोंदणी

नाफेडने हरभरा नोंदणीस २७ मार्चपासून प्रारंभ केला असून दोन एप्रिलपासून खरेदी प्रारंभ केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५७३ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. खरेदी मात्र एकाही शेतकऱ्याच्या मालाची झाली नाही. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार विदर्भ मार्केटिंगकडे ४९८ अर्ज आले असून १९० शेतकऱ्यांचे अर्ज अपलोड झालेले नाहीत. एनईएमएल पोर्टलवर तांत्रिक अडचणीमुळे नोंदणी होत नसल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com