Watermelon Price Drop: पांढरकवडा तालुक्यात कलिंगडदर दबावात

Farmers Struggling: यंदा मात्र अपेक्षित मागणी नसल्याच्या परिणामी कलिंगडाचे दर दबावात राहिले. परिणामी अनेकांचा उत्पादन खर्चही निघू शकला नाही.
Watermelon
WatermelonAgrowon
Published on
Updated on

Yavatmal News: ईदच्या कालावधीत बाजारात पुरवठा होणाऱ्या कलिंगडातून चांगला परतावा मिळतो. त्यामुळे खैरगाव देशमुखसह पांढरकवडा तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी कलिंगडाच्या लागवड क्षेत्रात वाढीत सातत्य राखले आहे. यंदा मात्र अपेक्षित मागणी नसल्याच्या परिणामी कलिंगडाचे दर दबावात राहिले. परिणामी अनेकांचा उत्पादन खर्चही निघू शकला नाही.

ईदच्या निमित्ताने कलिंगडाला बाजारात मागणी राहते. त्यामुळे हा बाजार कॅश करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असते. पांढरकवडा तालुक्‍यासह खैरगाव देशमुख परिसरातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांत कलिंगडाच्या याच बाजारातून चांगले पैसे झाले. त्यामुळेच या भागात गेल्या काही वर्षांत कलिंगडाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

Watermelon
Watermelon Production : खानदेशात कलिंगड हंगामास फटका लागवड राहिली अधिक

यंदा सुमारे २२५ ते २५० एकरांवर कलिंगड लागवड होती. या भागातील कलिंगडाचे लागवड क्षेत्र आणि व्यवस्थापनाच्या माध्यमातून दर्जा राखला जात असल्याने एजंटांच्या माध्यमातून थेट बांधावरूनच खरेदीवर भर असतो. सिलीगुडी, कोलकाता, दिल्ली, चंद्रपूर, नागपूर या भागांतून एजंट येतात व थेट खरेदी करतात.

त्यामुळे बाजारपेठ मिळविण्यासाठी जास्त संघर्ष शेतकऱ्यांना करावा लागत नाही. यंदा मात्र मार्चमध्ये बाजारात आलेल्या कलिंगडाला चांगला दर मिळाला. त्यानंतर मात्र दरात सातत्याने घसरण होत ते दबावात आले. परिणामी, उत्पादन खर्चही निघाला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. काही शेतकऱ्यांनी शिवारात पीक सोडल्याचे सांगितले.

कलिंगडाची डिसेंबर-जानेवारीत लागवड केली जाते. त्यानुसार फळे मार्चमध्ये काढणीस येतात. या फळांना साडेआठ रुपये किलोचा दर मिळाला. त्यानंतर दरात घसरण होत ते साडेसहा रुपये किलोवर आले. ७० ते ८० हजार रुपयांचा प्रति एकरी खर्च होतो. एका एकरातून पहिल्या दर्जाच्या मालाची सरासरी १७ ते १८ टनांपर्यंतचे उत्पादन होते. चार ते पाच टन फळांचा दर्जा दुय्यम असतो, असे प्रयोगशील शेतकरी प्रकाश पुप्पलवार यांनी सांगितले.

Watermelon
Watermelon Market: खानदेशात कलिंगड आवक घटली

शेतकऱ्यांवर फळे फेकण्याची वेळ

पथ्रोट (ता. अचलपूर, अमरावती) येथील शुक्रवारच्या आठवडे बाजारात कलिंगड विक्रीसाठी आले होते. दुय्यम दर्जाच्या या फळांची सुरुवातीला ८ रुपये किलोने विक्री झाली. मात्र ग्राहकांचा प्रतिसाद नसल्यामुळे २० रुपयांत तीन नग याप्रमाणे विक्री केली. त्यालाही खरेदीदार मिळत नसल्यामुळे अखेरीस फळे तशीच सोडून देत शेतकरी निघून गेले. कारण फळे परत नेल्यास वाहतुकीवर खर्च होणार होता. तो परवडणारा नसल्याने फळे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

अमरावतीत ५०० रुपये क्‍विंटल

नागपूरच्या कळमना बाजाराचा विचार करता या ठिकाणी गेल्या आठवड्यात कलिंगडाचे दर ८०० ते १५०० रुपये क्‍विंटल होते. अमरावती येथील फळ आणि भाजीपाला बाजारात सद्यःस्थितीत कलिंगडाची ३७० क्‍विंटल आवक आहे. या ठिकाणी याचे व्यवहार ५०० ते ९०० रुपये क्‍विंटलने होत असल्याचे सांगण्यात आले.

कलिंगडातून दरवर्षी चांगले पैसे होतात. त्यामुळे माझ्यासह अनेक शेतकरी दरवर्षी कलिंगड लागवडीवर भर देतात. यंदा मात्र सुरुवातीला कलिंगडातून चांगले पैसे झाले. आता काही शेतकऱ्यांवर फळे जनावरांना टाकण्याची किंवा फेकून देण्याची वेळ आली आहे. सध्या कलिंगडाचे दर दबावात आले आहेत.
प्रकाश पुप्पलवार, प्रयोगशील शेतकरी, खैरगाव देशमुख, यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com