Agrowon Podcast: लसणाचा भाव नरमला; कापूस, सोयाबीन, तूर तसेच काय आहेत ज्वारी दर?

Daily Commodity Market: आज आपण तूर, ज्वारी, लसूण, सोयाबीन आणि कापूस पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market
Agriculture Market Agrowon
Published on
Updated on

Market Bulletin:

तुरीचा भाव कमीच

देशातील बाजारात तुरीला सध्या हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. काही ठिकाणी आगाप लागवडीची तूर बाजारात विक्रीसाठी आली. पण आवक अगदीच किरकोळ आहे. तर यंदा उत्पादनवाढीचे अंदाज असल्याने भावावर दबाव आहे. सध्या बाजारात तुरीला ६ हजार ९०० ते ७ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. आवकेचा दबाव वाढल्यानंतरही तूर बाजारात या पातळीच्या दरम्यान राहू शकतो. आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दरात पुन्हा सुधारणा होऊ शकते, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ज्वारी दबावातच

बाजारात ज्वारीला मागील गेल्या काही महिन्यांपासून कमीच भाव मिळत आहे. बाजारातील ज्वारीची आवक कमीच आहे. मात्र खरिपातील वाढलेले उत्पादन आणि रब्बीतही चांगल्या उत्पादनाचा अंदाज, यामुळे ज्वारीच्या भावावर दबाव दिसून येत आहे. देशातील महत्वाच्या बाजारात सध्या ज्वारी वाण आणि गुणवत्तेप्रमाणे २ हजार ४०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. रब्बीतील ज्वारीची लागवड वाढली आहे. मात्र वाढती उष्णतेचा परिणाम ज्वारीच्या उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास ज्वारीच्या दरावरही परिणाम दिसेल, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Agriculture Market
Agri Budget 2025: पीएम-किमान, जीएसटी, पीककर्जाविषयी शेतकऱ्यांना अर्थमंत्र्यांकडून कोणत्या अपेक्षा? 

लसणाचे भाव नरमले

देशातील काही बाजारात लसणाची आवक सुरु झाली. नव्या मालाची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. लसणाला उठावही चांगला आहे. मात्र वाढत्या आवकेबरोबर भावातही चढ उतार दिसून येत आहेत. लसणाचे भाव मागील काही दिवसांमध्ये क्विंटलमागे २ ते ३ हजाराने कमी झाले आहेत. सध्या लसणाला प्रतिक्विंटल सरासरी १३ हजार ते १६ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढील काळात लसणाची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम दरावर दिसून येईल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

Agriculture Market
Rabi Sowing: मका, गव्हाच्या पेरणीत झाली वाढ; कडधान्यालाही पसंती तर तेलबिया पिकांची लागवड कमीच

सोयाबीनमध्ये चढ उतार

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात आज नरमाई पाहायला मिळाली. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १०.४२ डाॅलर प्रतिबुशेल्सपर्यंत कमी झाले होते. तर सोयापेंडचे वायदे २९९ डाॅलर प्रतिटनांपर्यंत नरमले होते. देशात सोयाबीनमधील मंदी कायम आहे. सोयाबीनचा भाव एकाच पातळीदरम्यान दिसत आहे. बाजारातील आवक काहीशी कमी दिसत असली तरी दरावर त्याचा परिणाम दिसत नाही. देशातील सोयाबीनची भावपातळी आजही ३ हजार ९०० ते ४ हजार १०० रुपयांच्या दरम्यान होती. तर प्रक्रिया प्लांट्सचे भाव ४ हजार ३५० ते ४ हजार ४५० रुपयांच्या दरम्यान होते. देशातील बाजारात सोयाबीन भाव आणखी काही आठवडे दबावातच राहू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापूस स्थिरावला

कापसाच्या भावावरील दबाव कायम आहे. त्यामुळे कापसाचे बाजारभावही स्थिर दिसत आहे. कापसाची बाजारातील आवक रोज दीड लाख गाठींच्या दरम्यान आहे. तर उद्योगांची खरेदी गरजेपुरती सुरु आहे. सीसीआयला सध्याही चांगला कापूस मिळत आहे. सध्याही कापूस दर हमीभावाच्या खालीच आहेत. कापसाला आजही सरासरी ७ हजार ते ७ हजार ३०० रुपयांचा भाव मिळाला. कापसाची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे. तर मार्चपासून बाजारातील आवक कमी होऊन कापूस दरात काहीशी सधारणाही होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com