Vegetable Market : टोमॅटो, फ्लॉवर, शेवग्याच्या दरात सुधारणा

गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये रविवारी (ता.४) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली.
Vegetable Market
Vegetable MarketAgrowon
Published on
Updated on

पुणे : श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक (vegetable Arrival) कमी झाली आहे. परिणामी टोमॅटो (Tomato), प्लॉवर (Coliflower) आणि शेवग्याच्या भावात वाढ झाली असून, घेवडा आणि वांग्याच्या भावात घट झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Vegetable Market
Wild Vegetable : रानभाज्यांच्या संवर्धनाला मिळतेय बळ

गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये रविवारी (ता.४) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशमधून हिरव्या मिरचीची २ ते ३ ट्रक, कर्नाटकातून कोबी २ ट्रक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमधून १ टेम्पो शेवगा, कर्नाटकमधून ४ ते ५ टेम्पो घेवडा, इंदूरहून ८ ते ९ टेम्पो गाजर, मध्य प्रदेशातून लसणाची १३ ते १४ ट्रक इतकी आवक झाली. तर राज्याच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आल्याची ८०० ते ९०० पोती, भेंडीची ५ ते ६ टेम्पो, गवारची ५ ते ६ टेम्पो, टोमॅटोची ५ ते ६ हजार कॅरेट, फ्लॉवरची ७ ते ८ टेम्पो, कोबीची ७ ते ८ टेम्पो, सिमला मिरचीची १० ते १२ टेम्पो, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, कांद्याची ७० ते ८० ट्रक, बटाटा आंध्र प्रदेश आणि इंदूर येथून ३० ते ३५ ट्रक बटाटा इतकी आवक झाली.

Vegetable Market
Tomato pests: मिरची, वांगी, टोमॅटोवरील किडींसाठी काय उपाय करावेत?

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव- कांदा : १००-१४०, बटाटा : १७०-२१०, लसूण : १००-४००, आले सातारी : १००-३५०, भेंडी : ३००-४००, गवार : गावरान व सुरती ३००-५००, टोमॅटो : १६०-२००, दोडका : ३५०-४००, हिरवी मिरची : ३००-४००, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : ३५०-३००, कारली : हिरवी ३००-३५०, पांढरी :२५०-३००, पापडी : ३५०-४००, पडवळ : २५०-३००, काकडी : १५०-२००, फ्लॉवर : ३५०-४००, कोबी : १२०-१८०, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : २००-२५०, तोंडली : कळी ३५०-४००, जाड : १६०-२००, शेवगा : ७००-७५०, गाजर : ३००-४००, वालवर : ३००-३५०, बीट : १४०-१६०, घेवडा : ३००-५००, कोहळा : १००-१५०, आर्वी: २००-२५०, घोसावळे : ३००-३५०, ढेमसे : २००-२५०, भुईमूग शेंग : ४५०-५००, मटार : स्थानिक: ४००-७००, पावटा : ३००-३५०, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : २००-२२०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

कोथिंबीर, कांदापात, चाकवत आणि पालकच्या भावात घट :

रविवारी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक वाढली असून, कोथिंबीर, कांदापात, चाकवत आणि पालकच्या भावात घट झाली असून, राजगिरा आणि चवळईच्या भावात वाढ झाली. मार्केट यार्डात कोथींबीर दोन लाख आणि मेथीची ८० हजार जुड्यांची आवक झाली आहे. घाऊक बाजारात जुडीमागे कोथिंबिरीच्या भावात ५ रुपयांनी, कांदापात सहा रुपये, चाकवत दोन रुपये आणि पालकच्या भावात तीन रुपयांनी घट झाली आहे. राजगिरा आणि चवळईच्या भावात प्रत्येक एक रुपयांनी वाढ झाली आहे.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ५००-१५००, मेथी : ६००-१२००, शेपू : ४००-८००, कांदापात : ८००-१२००, चाकवत : ४००-६००, करडई : ५००-७००, पुदीना : ३००-८००, अंबाडी : ४००-७००, मुळे : ८००-१५००, राजगिरा : ४००-७००, चुका : ६००-१०००, चवळई : ६००-८००, पालक : ६००-१२००.

डाळिंब, कलिंगड, लिंबू, पपई आणि खरबुजाच्या भावात वाढ

गणेशोत्सव सुरू असल्योन फळांना मागणी वाढली आहे. परिणामी डाळिंब, कलिंगड, लिंबू, पपई आणि खरबुजाच्या भावात वाढ झाली असून पेरूची आवक वाढल्याने भावात घट झाली आहे. तर सीताफळ, अननस, संत्रा, मोसंबी आणि चिक्कूचे भाव स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लिंबू एक ते दीड हजार गोणी, डाळिंब सुमारे ४० ते ४५ टन, पपई ५ ते ६ टेम्पो, कलिंगड ५ ते ६ टेम्पो, खरबूज सुमारे २० ते ३० टेम्पो, पेरू ८०० ते ९०० के्रट, अननस ३ ट्रक, मोसंबी ६० ते ७० टन, संत्रा ८ ते १० टन, सीताफळ ३० ते ३५ टन, चिकू दोन हजार बॉक्स इतकी आवक झाली होती़.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ७००-९००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ४०-१६०, गणेश : ५-२५, आरक्त १०-६०. कलिंगड : ८-१५, खरबूज : २०-३०, पपई : १५-३५, अननस (एक डझन) ७०-२७०, पेरू (२० किलो) ३००-४०० मोसंबी (तीन डझन) १००-२००, (चार डझन) ३०-६०, संत्रा (दहा किलो) ३००-८५०, सीताफळ (एक किलो) २०-१२०, चिक्कू (१० किलो)१००-६००.

झेंडूच्या भावात निम्म्याने घट

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फुलबाजारात झेंडूची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने भावात निम्म्याने घट झाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे फुलांना फटका बसला आहे. अन्य फुलांना मागणी साधारण असून, दर स्थिरच असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-३०, गुलछडी : १५०-३००, अॅस्टर (५ जुड्या) ः १०-२०, सुटा १५०-२००, बिजली : ८०-१५०, कापरी : २०-४०, शेवंती : ८०-१५०, (गड्डीचे भाव) गुलाब गड्डी : २०-५०, गुलछडी काडी : ३०-८०, डच गुलाब (२० नग) : ६०-१५०, जरबेरा : ४०-७०, कार्नेशियन : १५०-२००, शेवंती काडी १५०-२००, लिलीयम (१० काड्या) १२००-१३००, ऑर्चिड ४००-६००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ७०-१००.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com