Agrowon Podcast: लसणाच्या दरात घसरण; डाळिंब, कापूस, ज्वारी आणि सोयाबीनचे दर काय?

Daily Commodity Rates: आज आपण डाळिंब, कापूस, ज्वारीआणि सोयाबीन पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Market Update
Market UpdateAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin:

कापूस भावात चढ-उतार

राज्यात कापूस उत्पादन शेतकरी उत्पादन खर्चही वसूल होत नसल्यामुळे मेटाकुटीला आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाच्या भावात चढ उतार सुरू आहेत. तर तर राज्यातील बाजारात कापसाला आज ७ हजार ते ७ हजार ४०० च्या दरम्यान दर मिळाला आहे. आज अमरावती बाजारात दुपारपर्यंत ९० क्विंटल झाली. तर देऊळगाव बाजारात ८०० क्विंटल आणि नारखेड बाजारात १०६ क्विंटल आवाक झाली. फेब्रुवारीच्या शेवटी कापूस बाजारात आवक काहीशी कमी होईल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी वर्तवला आहे.

सोयाबीन दबावात

सोयाबीनचे दर राज्यातील बाजारात ३ हजार ९०० ते ४ हजारच्या दरम्यान आहेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादक नाराज आहेत. आज दुपारपर्यंत सोयाबीनची सर्वाधिक १६ हजार १२ क्विंटल आवक लातूर बाजारात झाली. त्या खालोखाल कारंजा बाजारात ५ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली. सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा ८०० ते ९०० रूपयांनी कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. सोयाबीन भाव आणखी काही दिवस दबावात राहू शकतात, अशी शक्यता बाजार अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

Market Update
Agrowon Podcast: आल्याच्या भावात मोठी घसरण; हळद, केळी, कापूस तसेच काय आहे सोयाबीन भाव?

डाळिंबाची आवक घटली

राज्यात मृग बहारातील डाळिंब विक्री शेवटच्या टप्प्यात आली आहे. बाजारातील आवकही कमी झाली आहे. राज्यातील बाजारात आज दुपारपर्यंत डाळिंबाला १० हजार ते १३ हजार ५०० दरम्यान भाव मिळाला. यंदाच्या हंगामात डाळिंबाला काहीसा चांगला दर मिळाला. परंतु किडरोगांच्या प्रादुर्भावाने उत्पादनात घट आली. आज मुंबईतील बाजारात सर्वाधिक ९४४ क्विंटलची आवक झाली. तर छत्रपती संभाजीनगर, अमरावती, पुणे, सांगोला, सांगली नागपूर बाजारात आवाक घटली आहे. तसेच पुढील काळातही दर टिकून राहतील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Market Update
Sugar Production: साखर उत्पादनात घसरण सुरूच! जानेवारीअखेर १६५ लाख टन उत्पादन

ज्वारीचे दर दबावात

ज्वारीची आवक बाजारात कमीच आहे. राज्यातील बाजारात ज्वारीला आज १ हजार ७९५ ते २ हजार १२२ रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. रब्बी ज्वारीच्या काढणीचा हंगाम तोंडावर आला आहे. परंतु बाजारात दर कमीच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे. मागील महिन्याभरापासून ज्वारीची आवक कमी आहे. तर दरही दबावात आहेत. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच उष्णतेच्या झळा तीव्र झाल्याने ज्वारी पिकावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.

लसणाच्या दरात घसरण

राज्यातील बाजारात नव्या हंगामातील लसणाची आवक सुरू झाली आहे. नवीन आवकेमुळे दरात घसरण झाली. लसणाला सध्या ७ हजार ७५० ते १० हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दर मिळत आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी आवक कमी असताना लसणाच्या दरात तेजी होती. परंतु आता मात्र नवीन आवक सुरू होताच लसणाच्या दरात घसरण सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. आज दुपारपर्यंत नागपूर बाजारात सर्वाधिक १ हजार ६८० क्विंटलची आवक झाली. तर अकोला बाजारात दुपारपर्यंत सर्वाधिक भाव प्रतिक्विंटल १० हजार रुपयांचा मिळाला. लसणाच्या दरातील घसरणीने शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com