Sugar Production: साखर उत्पादनात घसरण सुरूच! जानेवारीअखेर १६५ लाख टन उत्पादन

Sugar Update: नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्याअखेरही यंदा साखर उत्पादनाची घसरण सुरूच आहे. ३१ जानेवारीअखेर देशात २२ लाख टन साखर उत्पादन कमी झाले आहे. तुटीच्या अंदाजाचा आकडा वाढत आहे.
Sugar Production
Sugar ProductionAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News: नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्याअखेरही यंदा साखर उत्पादनाची घसरण सुरूच आहे. ३१ जानेवारीअखेर देशात २२ लाख टन साखर उत्पादन कमी झाले आहे. तुटीच्या अंदाजाचा आकडा वाढत आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत डिसेंबरअखेर चाळीस लाख टन साखर कमी होईल, असा अंदाज होता. जानेवारीचा गाळप हंगाम लक्षात घेता हा आकडा आता ४९ लाख टन इतका सांगितला जात आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने ही माहिती दिली आहे.

Sugar Production
Sugar Production : साताऱ्यात ५५ लाख क्विंटल साखरनिर्मिती

यंदा देशात एकूण ४९४ कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला जो गेल्या वर्षीच्या ५१७ कारखान्यांपेक्षा २३ ने कमी आहे. या तारखेपर्यंत देश पातळीवर १८५५ लाख टन ऊस गाळप झाले. ते गत वर्षीच्या या तारखेपर्यंत झालेल्या १९३१ लाख टन गाळपापेक्षा ७६ टनाने कमी आहे.

याच्या परिणामस्वरूप ३१ जानेवारी अखेर देशपातळीवर १६५ लाख टन नवे साखर उत्पादन झाले. ते गतवर्षीच्या या तारखेपर्यंतच्या १८७ लाख टन उत्पादनापेक्षा २२ लाख टनाने कमी आहे. देशपातळीवर सरासरी साखर उतारा ८.९१ टक्के आहे. हा उतारा गतवर्षीच्या या तारखेच्या ९.७० टक्क्यांपेक्षा ०.७९ टक्क्याने कमी आहे

Sugar Production
Sugar Production : ‘नॅचरल’चे उत्पादित सहा लाख साखर पोत्याचे पूजन

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा हंगाम २०२४-२५ हा वातावरणातील बदलत्या चक्रामुळे एका विचित्र परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. आधी असणाऱ्या दुष्काळसदृश परिस्थिती नंतर अति पाऊस व काही ठिकाणी परतीचा पाऊस झाल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बऱ्याच भागातील उभ्या उसावर तुरे पडले आहेत.

ज्यामुळे उसाची वाढ खुंटल्याचे तसेच त्यातील साखरेचे प्रमाण घटल्याचे निदर्शनास येत आहे. हा ऊस तातडीने गाळपास येत असल्याने अनेक भागातील कारखान्यांचा गाळप हंगाम अपेक्षेपेक्षा लवकर आटोपला जाण्याचा अंदाज आहे. साखर निर्यातीमुळे दरात काही प्रमाणात अपेक्षित आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांतील गाळप हंगाम बंद होण्यास सुरुवात झाली आहे.
हर्षवर्धन पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ

जानेवारीअखेर आघाडीच्या तीन राज्यांचे साखर उत्पादन. लाख टनात (कंसात गेल्यावर्षीचे साखर उत्पादन)

- उत्तर प्रदेश --- ५३ (५८ )

- महाराष्ट्र ५६ --- (६५ )

- कर्नाटक ३३ --- (३७ लाख)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com