Garlic Rate: लसणाचे दर प्रति क्‍विंटल तीन ते १३ हजार रुपयांवर

Market Update: हंगामातील नव्या लसणाची आवक होताच बाजारात तेजीत असलेल्या लसूण दरात घसरण नोंदविण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात लसणाची आवक १००० क्‍विंटलपेक्षा अधिक असताना दर १८ हजार ते ३२ हजार रुपये क्‍विंटलवर पोहोचले होते.
Garlic
GarlicAgrowon
Published on
Updated on

Nagpur News: हंगामातील नव्या लसणाची आवक होताच बाजारात तेजीत असलेल्या लसूण दरात घसरण नोंदविण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात लसणाची आवक १००० क्‍विंटलपेक्षा अधिक असताना दर १८ हजार ते ३२ हजार रुपये क्‍विंटलवर पोहोचले होते. आता मात्र आवक १६०० क्‍विंटलवर असताना दर ३००० ते १३ हजार रुपये असे आहेत.

Garlic
Garlic Market : लसणाचे दर प्रति क्‍विंटल तीन ते १३ हजार रुपयांवर

कळमना बाजार समितीत उत्तर प्रदेशसह देशाच्या विविध भागांतून लसूण आवक होते, असे व्यापारी सूत्रांनी सांगितले. नजीकच्या काळात लसणाला चांगला दर मिळत असल्याने विदर्भातही या पिकाखालील क्षेत्र वाढले आहे. त्याच्याच परिणामी हंगामात नव्या लसणाची आवक होताच दर दबावात येतात, अशी स्थिती राहते.

नोव्हेंबर २०२४ मध्ये बाजारात लसणाचे दरात सुधारणा नोंदविली गेली. १६ नोव्हेंबरपूर्वी दर काहीसे दबावात होते. त्यानंतर आवक पूर्वीच्या ४२० क्विंटलवरून थेट ११२० क्‍विंटलवर पोहोचली. त्यानंतर लसणाचे दरातही तेजी येत ते २० हजार ते ३४ हजार रुपये क्‍विंटलवर पोहोचले, असे व्यापारी सांगतात.

Garlic
Garlic Rate : देशातील सर्वात मोठ्या मंदसौर लसून मार्केटमध्ये पावसाचा धुमाकूळ; भिजलेला लसून घेण्यास व्यापाऱ्यांचा नकार

आता १५ जानेवारी दरम्यान ५६० क्‍विंटल लसणाची आवक होत आठ हजार ते १८ हजार रुपये क्‍विंटलचा दर मिळाला. त्यानंतर दरात सुधारणा होत ते ८ हजार ते २० हजारांवर पोहोचले. २७ जानेवारीला आवक १६८० क्‍विंटल व दर ३००० ते १३ हजार रुपये असे होते. ३० जानेवारीला दरात पुन्हा घसरण झाली. या वेळी २३८० क्‍विंटलची आवक व दर २००० ते १० हजार रुपये असे होते. सध्या लसणाचे व्यवहार याच दराने होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

अमरावतीत २५० क्‍विंटल आवक

विदर्भात भाजीपाल्यासाठी अमरावती येथील फळ व भाजीपाला बाजारपेठ नागपूरनंतर दुसऱ्या क्रमांकाची ओळखली जाते. या ठिकाणी देखील हंगामी फळांसह भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर होते. या बाजार समितीत सध्या लसणाची २५० क्‍विंटल इतकी अत्यल्प आवक नोंदविली जात आहे. अमरावतीमध्ये लसणाला ३००० ते ११ हजार रुपयांचा दर मिळत असल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com