Garlic Market : लसणाचे दर प्रति क्‍विंटल तीन ते १३ हजार रुपयांवर

Garlic Cultivation : कळमना बाजार समितीत उत्तर प्रदेशसह देशाच्या विविध भागांतून लसूण आवक होते, असे व्यापारी सूत्रांनी सांगितले. नजीकच्या काळात लसणाला चांगला दर मिळत असल्याने विदर्भातही या पिकाखालील क्षेत्र वाढले आहे.
Garlic
Garlic RateAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : हंगामातील नव्या लसणाची आवक होताच बाजारात तेजीत असलेल्या लसूण दरात घसरण नोंदविण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात लसणाची आवक १००० क्‍विंटलपेक्षा अधिक असताना दर १८ हजार ते ३२ हजार रुपये क्‍विंटलवर पोहोचले होते. आता मात्र आवक १६०० क्‍विंटलवर असताना दर ३००० ते १३ हजार रुपये असे आहेत.

कळमना बाजार समितीत उत्तर प्रदेशसह देशाच्या विविध भागांतून लसूण आवक होते, असे व्यापारी सूत्रांनी सांगितले. नजीकच्या काळात लसणाला चांगला दर मिळत असल्याने विदर्भातही या पिकाखालील क्षेत्र वाढले आहे.

त्याच्याच परिणामी हंगामात नव्या लसणाची आवक होताच दर दबावात येतात, अशी स्थिती राहते. नोव्हेंबर २०२४ मध्ये बाजारात लसणाचे दरात सुधारणा नोंदविली गेली. १६ नोव्हेंबरपूर्वी दर काहीसे दबावात होते.

Garlic
Garlic Price : लसणाने ओलांडली दरांची पातळी

त्यानंतर आवक पूर्वीच्या ४२० क्विंटलवरून थेट ११२० क्‍विंटलवर पोहोचली. त्यानंतर लसणाचे दरातही तेजी येत ते २० हजार ते ३४ हजार रुपये क्‍विंटलवर पोहोचले, असे व्यापारी सांगतात. आवक वाढती असली तरी मागणी देखील तुलनेत अधिक असल्याने नोव्हेंबर २०२४ मध्येही स्थिती होती.

त्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत देखील दरातील तेजी कायम असताना आता मात्र हंगामातील नव्या लसणाची आवक आणि मागणी कमी त्याच्या परिणामी दर दबावात आल्याचे चित्र आहे. यावर्षी १५ जानेवारी दरम्यान ५६० क्‍विंटल लसणाची आवक होत आठ हजार ते १८ हजार रुपये क्‍विंटलचा दर मिळाला.

Garlic
Garlic Crop : मध्य प्रदेशात लसूण पिकाला भाजीपाला म्हणून मान्यता

त्यानंतर दरात सुधारणा होत ते ८ हजार ते २० हजार रुपयांवर पोहोचले. २७ जानेवारी दरम्यान आवक १६८० क्‍विंटल आणि दर ३००० ते १३ हजार रुपये असे होते. ३० जानेवारीला दरात पुन्हा घसरण नोंदविण्यात आली. या वेळी २३८० क्‍विंटलची आवक आणि दर २००० ते १० हजार रुपये असे होते. सद्यःस्थितीत लसणाचे व्यवहार याच दराने होत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

अमरावतीत २५० क्‍विंटल आवक

विदर्भात भाजीपाल्यासाठी अमरावती येथील फळ व भाजीपाला बाजारपेठ नागपूरनंतर दुसऱ्या क्रमांकाची ओळखली जाते. या ठिकाणी देखील हंगामी फळांसह भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर होते. या बाजार समितीत सध्या लसणाची २५० क्‍विंटल इतकी अत्यल्प आवक नोंदविली जात आहे. अमरावतीमध्ये लसणाला ३००० ते ११ हजार रुपयांचा दर मिळत असल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com