Garlic Rate : देशातील सर्वात मोठ्या मंदसौर लसून मार्केटमध्ये पावसाचा धुमाकूळ; भिजलेला लसून घेण्यास व्यापाऱ्यांचा नकार

Garlic Market Mandsaur : लसूण विक्रीच्या दृष्टीने राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वात मोठी मंदसौर कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. मागील ५ वर्षांत शेतकऱ्यांना लसूणला चांगला भाव मिळत होता.
Garlic Rate
Garlic Rateagrowon
Published on
Updated on

Madhya Pradesh Mandsaur Garlic Market : मध्य प्रदेशमधील लसूण बाजारपेठ असलेल्या मंदसौर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात जोरदार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे मंदसौर कृषी उत्पन्न बाजारात लसूण विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचा लाखो रूपयांचा माल वाहून गेला. लसूण विक्रीच्या दृष्टीने राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वात मोठी मंदसौर कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे.

मात्र, दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने लसूण बाजारपेठेला तळ्याचे स्वरूप आले होते. व्यापाऱ्यांनी हा माल घेण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

मंदसौर बाजारपेठेत माल ठेवण्याची पुरेसी व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांनी आपला माल उघड्यावर ठेवला होता. मुसळधार पाऊस पडल्याने उघड्यावर असलेला लसूण वाहून जाण्यास सुरूवात झाली. यातील काही शेतकऱ्यांनी लसूण वाचवला परंतु तो भिजलेल्या अवस्थेत असल्याने व्यापाऱ्यांकडून लसूण घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. मागील ५ वर्षांत शेतकऱ्यांना लसूणला चांगला भाव मिळत होता. मात्र, लसूणच भिजल्याने शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणे कठीण झाले आहे.

Garlic Rate
Garlic Rate : लसणाला ३०० रुपये किलो उच्चांकी दर

सध्या लसूणला प्रतिक्विटल १२ हजार ते ३० हजार असा दर मिळत आहे. लसूण बाजारात सौदे सुरू झाल्यानंतर सकाळच्या सत्रात विक्री झालेल्या कांद्याला चांगला भाव होता. मात्र, अतिवृष्टीनंतर उघड्यावर पडलेला लसूण भिजल्याने व्यापाऱ्यांनी माल घेण्यास स्पष्ट नकार दिला.

व्यापाऱ्यांनी लसूण खरेदीस नकार दिला

शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या लसूणला चांगला भाव असल्याने मंदसौर बाजार पेठेत मध्य प्रदेशसह महाराष्ट्रातून शेतकरी लसूण घेऊन आले होते. परंतु, दुपारी जोरदार पाऊस झाल्याने लसूण भिजला. २५ हजार रुपये क्विंटलने विकला जाणारा लसूण ओला झाल्याने व्यापाऱ्यांनी खरेदी करण्यास नकार दिल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

घोषणा करूनही शेतकरी सहमत नाहीत

दरम्यान मंदसौर कृषी उत्पन्न बाजारसमितीचे प्रभारी सचिव जगदीश भामर यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही लसूण उत्पादक शेतकऱ्यांना वातावरणातील बदलाची आदीच माहिती दिली होती. मात्र, शेतकऱ्यांनी आपला माल मोकळ्या जागेत ठेवणे पसंत केले. यादरम्यान जोरदार पाऊस झाल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे". अशी माहिती भामर यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com