Turmeric Cultivation : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीत ४३ एकरांवर हळद लागवड

Sindhudurg Farmers : वैभववाडी तालुक्यात हळदीचे क्षेत्र गेल्या वर्षीपर्यंत एक दोन एकरपर्यंत मर्यादित होते. गेल्या वर्षी कोकण व्हिजन शेतकरी कंपनीने हळद लागवड क्षेत्र वाढविण्यावर भर दिला
Turmeric Cultivation
Turmeric Cultivationagrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा ः एकनाथ पवार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात हळद लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ४३ एकर क्षेत्रावर लागवड करून २०० टन उत्पादन घेण्यात आले आहे. त्याकरिता कोकण व्हिजन शेतकरी कंपनीचा पुढाकार घेतला आहे.

वैभववाडी तालुक्यात हळदीचे क्षेत्र गेल्या वर्षीपर्यंत एक दोन एकरपर्यंत मर्यादित होते. गेल्या वर्षी कोकण व्हिजन शेतकरी कंपनीने हळद लागवड क्षेत्र वाढविण्यावर भर दिला. तालुक्यातील ११ गावांतील २८ शेतकऱ्यांना एकत्र करीत हळद लागवडीकरिता प्रोत्साहित केले. जे शेतकरी हळद लागवडीकरिता मशागत करतील अशा शेतकऱ्यांनाच हळद पुरविण्यात आली.

गेल्या वर्षी ४३ एकरवर हळद लागवड झाली. त्यातून शेतकऱ्यांनी २०० टन उत्पादन घेतले आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून शेतकरी कंपनीला बॉयलर, पॉलीशरकरिता अनुदान देण्यात आले. अर्धा टन क्षमतेचे दोन बॉयलर खरेदी केले. या बॉयलरमध्ये यावर्षी दोनशे टन हळदीवर प्रक्रिया करण्यात आली.

Turmeric Cultivation
Sindhudurg Rain News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडाटांसह पाऊस

कोकण कृषी विद्यापीठाचे डॉ. अजय राणे आणि डॉ. योगेश गावकर यांनी हळद लागवडीकरिता प्रोत्साहित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. ‘कृषी’चे उपविभागीय अधिकारी उमाकांत पाटील यांनीदेखील लागवडीला प्रोत्साहन दिले.

या वर्षी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून हळद लागवड क्षेत्र आणखी वाढविण्याचा प्रयत्न आहे. याशिवाय हळद उत्पादन, प्रक्रिया तंत्रज्ञान, पॅकिंग, ग्रेडिंग अशा सर्वांबाबत शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

- निरंजन देशमुख, तालुका कृषी अधिकारी, वैभववाडी

मी यावर्षी अडीच एकर क्षेत्रावर हळद लागवड केली होती. त्यातून मला २३ टन ओली हळद मिळाली. प्रक्रियेअंती ती हळद मी विक्री केली. मुख्य शेतीला हळदीची जोड दिल्यामुळे आर्थिक नफादेखील चांगला झाला.

- रवींद्र गावडे, हळद उत्पादक, नापणे

कृषी विभागाने हळदीला आवश्यक खते, लागवडी, नागंरणीकरिता ट्रॅक्टर, भरणी यंत्र, अशा यंत्रांचा पुरवठा केल्यास मोठ्या प्रमाणात लागवड होईल. सिंधुरत्नअंतर्गत प्रस्तावदेखील दिला आहे.

- मंगेश कदम, अध्यक्ष, कोकण व्हिजन शेतकरी कंपनी तथा आत्मा समिती वैभववाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com