Jamun Production : जांभळाच्या उत्पादनात घट

Jamun Rate : एकीकडे उत्पादन कमी असताना दुसरीकडे जांभळाला प्रतिकिलो २५० रुपयांचा दर मिळत असल्याने उत्पादकांना किंचित दिलासा मिळत आहे.
Jamun
Jamun Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यात तब्बल दीड महिना विलंबाने या वर्षीचा जांभूळ हंगाम सुरू झाला असला तरी उत्पादकांच्या पदरी घोर निराशाच आली आहे. १० टक्केदेखील उत्पादन आले नसल्यामुळे जांभूळ उत्पादक संकटात सापडले आहेत. एकीकडे उत्पादन कमी असताना दुसरीकडे जांभळाला प्रतिकिलो २५० रुपयांचा दर मिळत असल्याने उत्पादकांना किंचित दिलासा मिळत आहे.

जिल्ह्यातील काही गावांचे अर्थकारण जांभूळ उत्पादनावर बरेच अवलंबून आहे. निरूखे, आकेरी, झाराप यासह कुडाळ, सावंतवाडी तालुक्यांतील अनेक गावांमध्ये पांरपरिक जांभूळ झाडे आहेत. येथील जांभळाला मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूरसह विविध भागांत मोठी मागणी आहे. दरवर्षी जांभूळ हंगाम मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होतो.

Jamun
Jamun Orchard Management : दर्जेदार जांभूळ उत्पादनासाठी बागेचे व्यवस्थापन

गेल्यावर्षी पहिल्या टप्प्यातील हंगाम १६ मार्चपासून सुरू झाला. त्यानंतर हंगाम जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू होता. परंतु यावर्षी ४ मे पासून हंगाम सुरू झाला. मात्र या हंगामाची सुरुवात जाभूळ उत्पादकांसाठी निराशाजनक राहिली आहे. दरवर्षीच्या तुलनेत दहा टक्केदेखील जांभूळ उत्पादन मिळत नसल्यामुळे उत्पादकांमध्ये नाराजी आहे.

दरवर्षी प्रतिकिलो १०० रुपये दर असायचा परंतु यावर्षी प्रतिकिलो २५० रुपये दर जाभळाला मिळत आहे. चांगल्या दराचा उत्पादकांना दिलासा मिळत असला तरी उत्पादनात मोठी घट आहे. जांभूळ हंगाम सुरू होऊन १३ ते १४ दिवस झाले आहेत.

परंतु अपेक्षित आवक झालेली नाही. त्यामुळे उत्पादकांबरोबरच जांभूळ व्यावसायिक देखील मेटाकुटीला आले आहेत. आंबा, काजू, कोकमसह आता जांभूळ पिकाला देखील बदलत्या वातावरणाचा मोठा फटका बसला आहे.

Jamun
Jamun Season : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जांभूळ हंगाम लांबणीवर

पूर्वमोसमीचे संकट

यावर्षी ४ मे पासून जांभूळ उत्पादन सुरू झाले असले तरी १० टक्केच उत्पादन मिळण्याचा अंदाज आहे. मात्र या उत्पादनावर पूर्वमोसमी पावसाचे संकट आहे. जिल्ह्यात सध्या पूर्वमोसमी पाऊस सुरू आहे. त्यामुळे मिळणाऱ्या तुटपुंजा उत्पादनावर देखील पावसाचे सावट आहे. त्यामुळे जांभूळ उत्पादक आर्थिक संकटात येण्याची शक्यता आहे.

मी ३५ वर्षांपासून जांभूळ उत्पादन आणि खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत आहे. परंतु पहिल्यांदाच जांभूळ उत्पादनात इतक्या मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यावर्षी १० टक्केदेखील उत्पादन मिळण्याची शक्यता कमी आहे.
- अनिरुद्ध करंदीकर, जांभूळ उत्पादक व व्यावसायिक, निरूखे (ता. कुडाळ)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com