Jamun Season : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जांभूळ हंगाम लांबणीवर

Jamun Season Update : एप्रिलचा दुसरा आठवडा सुरू झाला असला तरी अजूनही जांभूळ हंगामाला सुरुवात झालेली नाही. जांभूळ हंगाम महिनाभर लांबणीवर गेल्याने उत्पादकांचा जीव टांगणीला लागला आहे.
Jamun Season
Jamun SeasonAgrowon

Sindhudurg News : एप्रिलचा दुसरा आठवडा सुरू झाला असला तरी अजूनही जांभूळ हंगामाला सुरुवात झालेली नाही. जांभूळ हंगाम महिनाभर लांबणीवर गेल्याने उत्पादकांचा जीव टांगणीला लागला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरूखे, आकेरी, कुंदे (ता. कुडाळ) या गावांसह आणखी काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जांभूळ उत्पादन घेतले जाते. पांरपरिक झाडांसोबत गेल्या पाच-सहा वर्षांपासून या गावांमध्ये व्यावसायिक जांभूळ लागवडदेखील करण्यात आली आहे. जिल्ह्यात सरासरी २५० टन जांभूळ उत्पादन येते.

Jamun Season
Jamun Orchard Management : दर्जेदार जांभूळ उत्पादनासाठी बागेचे व्यवस्थापन

साधारणपणे दीड दोन कोटींची उलाढाल जांभळापासून होते. जिल्ह्यात मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासुन जांभूळ हंगाम सुरू होतो. गेल्या वर्षी १३ मार्चपासून हंगामाला सुरुवात झाली होती. परंतु यावर्षी एप्रिलचा दुसरा आठवडा उजाडला तरी हंगामाची चाहुल दिसत नाही. नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसाचा हा परिणाम असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

त्यामुळे जांभूळ उत्पादकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. एप्रिल अखेरपर्यंत जांभूळ हंगाम सुरू होण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात १० मे नंतर कोणत्याही क्षणी पूर्वमोसमी पाऊस पडतो. हा पाऊस वादळीवाऱ्यांसह होतो. त्यामुळे त्याचवेळी जांभूळ हंगामाची सांगता होते.एकदा पाऊस पडल्यानंतर जांभूळ उत्पादनाचा काहीही उपयोग होत नाही.

Jamun Season
जांभूळ उंचावतेय आदिवासी शेतकऱ्यांचे अर्थकारण

त्यामुळे या वर्षीचा हंगाम औटघटकेचा ठरण्याची शक्यता आहे. जांभूळ हंगाम लांबल्यामुळे जिल्ह्यातील उत्पादकांसह प्रक्रिया उद्योजकांनादेखील इतर जिल्ह्यांतून जांभूळ प्रकियेसाठी आणावी लागणार आहेत.

दरवर्षी मार्चमध्ये जांभूळ हंगाम सुरू होतो. यंदा अजूनही हंगाम सुरू झालेला नाही. जितका हंगाम लांबणार तितके उत्पादकांचे नुकसान होणार आहे.
अनिरुद्ध करंदीकर, जांभूळ उत्पादक, निरूखे, ता. कुडाळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com