Jowar Market : ज्वारीच्या दरात घसरण

Jowar Rate : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ज्वारीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
Jowar
Jowar Agrowon

Parbhani News : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ज्वारीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी ज्वारीचे दर प्रतिक्विंटल साडेचार ते पाच हजार रुपयांवर होते. परंतु गेल्या काही आठवड्यापासून किमान दर अडीच हजार रुपयांपर्यंत कमी झाले आहेत.

गतवर्षी कमी पाऊस झाल्यामुळे रब्बीचे क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता होती. परंतु नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसानंतर या दोन जिल्ह्यांत रब्बी ज्वारीचा पेरा वाढला आहे. शुक्रवार (ता. ५) अखेर परभणी जिल्ह्यात ८६ हजार ५०५ हेक्टरवर तर हिंगोली जिल्ह्यात १६ हजार ८९९ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. ज्वारीचा पेरा वाढल्यामुळे दरात घसरण सुरू झाली आहे, असे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

Jowar
Jowar Sowing : मराठवाड्यात यंदा ज्वारीची पेरणी कमीच

परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (ता. ५) ज्वारीची ४७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ३००० ते कमाल ३५०० रुपये तर सरासरी ३३०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. ४) ज्वारीची ३५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ३००० ते कमाल ३८५० रुपये तर सरासरी ३६५० रुपये दर मिळाले.

बुधवारी (ता. ३) ज्वारीची ३८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ३००० ते कमाल ३८०० रुपये तर सरासरी ३२०० रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. १) ज्वारीची ३७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान २३०० ते कमाल २९०० रुपये तर सरासरी २५०० रुपये दर मिळाले.

Jowar
Jowar Production : काकवी - गोड धाटाच्या ज्वारीची!

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारात एकदिवसाआड ज्वारीची आवक होत आहे.शनिवारी (ता. ६) ज्वारीची १५ क्विंटल आवक होती.ज्वारीला प्रतिक्विंटल किमान २४०० ते कमाल ३५७० रुपये तर सरासरी २९८५ रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता. ४) ज्वारीची १५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान २५०० ते कमाल ५१८० रुपये तर सरासरी ३८४० रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. २) ज्वारीची १५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान २२०० ते कमाल ३४०० रुपये तर सरासरी २८०० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com