Soybean Cultivation: मध्य प्रदेशात सलग लागवडीमुळे सोयाबीन ठरते फायदेशीर

Soybean Market Update: सोयाबीनमध्ये आंतरपिकाचा अंतर्भाव न करता सलग पीक घेण्यावर भर, हंगामअखेरीस काढणी-मळणीसाठी हार्वेस्टरचा पर्याय आणि त्यानंतर दोन पिके घेतली जात असल्याने हा तिहेरी पिकांचा पॅटर्न मध्य प्रदेशातील शेती आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असल्याची माहिती नन्हेगाव, (जि. नरसिंगपूर, मध्य प्रदेश) येथील राव गुलाबसिंग लोधी यांनी दिली.
Farmer Rao Gulabsingh Lodhi
Farmer Rao Gulabsingh LodhiAgrowon
Published on
Updated on

Nagpur News: सोयाबीनमध्ये आंतरपिकाचा अंतर्भाव न करता सलग पीक घेण्यावर भर, हंगामअखेरीस काढणी-मळणीसाठी हार्वेस्टरचा पर्याय आणि त्यानंतर दोन पिके घेतली जात असल्याने हा तिहेरी पिकांचा पॅटर्न मध्य प्रदेशातील शेती आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असल्याची माहिती नन्हेगाव, (जि. नरसिंगपूर, मध्य प्रदेश) येथील राव गुलाबसिंग लोधी यांनी दिली.

मध्य प्रदेशात सुमारे ५३ लाख हेक्‍टरवर सोयाबीन लागवड होते. त्यानंतर महाराष्ट्रात ५० ते ५१ लाख हेक्‍टर इतके सरासरी सोयाबीन लागवड क्षेत्र राहते. महाराष्ट्रात जोखीम करण्याच्या प्रयत्नांतर्गत सोयाबीनमध्ये तूर किंवा तत्सम आंतरपीक घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. त्यामुळे सोयाबीन काढणीचे काम मजुरांच्या माध्यमातून करण्याशिवाय इतर कोणताच पर्याय राहत नाही.

Farmer Rao Gulabsingh Lodhi
Soybean Theft Case : सोयाबीन चोरीचा पोलिसांनी २४ तासांत लावला छडा

मजुरी खर्चात मोठी वाढ झाल्याने उत्पादकता खर्चही वाढतो. त्याबरोबरच थ्रेशरच्या सहाय्याने मळणीवर देखील अतिरिक्‍त खर्च करावा लागतो. गेल्या काही वर्षांत ऐन काढणीच्या वेळी धो-धो पाऊस कोसळत असल्याने नुकसान सोसावे लागत आहे. शेतात तुरीचे आंतरपीक असल्याने काही कारणांमुळे त्याचा हंगाम लांबल्यास दुबार पीक घेणे शक्‍य होत नाही. यातून महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादकांची स्थिती अपेक्षित प्रमाणात सुधारली नाही, असे सांगितले जाते. ३५०० रुपये कापणीवर मजूर घेतात, १००० रुपये एकर थ्रेशरच्या काढणीवर सोयाबीनला खर्च होतो.

मध्य प्रदेशात असा आहे पॅटर्न

मध्य प्रदेशात आंतरपीक न घेता सोयाबीनची सलग लागवड होते. त्यामुळे ८० टक्‍के सोयाबीनची हार्वेस्टरने काढणी होते. परिणामी कापणी, मळणीचा खर्च कमी होतो. त्यानंतर मसूर अथवा हरभरा लावण्यासाठी शेती तयार केली जाते. मसूरची २५ ऑक्‍टोबर दरम्यान लागवड होते. १२० दिवसांत हे पीक निघून जाते.

Farmer Rao Gulabsingh Lodhi
Soybean Market : खरेदी केंद्रांवर सोयाबीन देण्यास शेतकरी निरुत्साही

साधारणपणे २८ फेब्रुवारीपर्यंत मसूर पिकाची काढणी होते. मसूर लागवडकर्ते बहुतांश शेतकरी उडीद लावतात. एक मार्चपर्यंत उडीद लावला जातो. गहू, हरभरा घेणाऱ्या शेतकऱ्यांची ८ ते १० मार्चपर्यंत हरभरा काढणी होते. त्यामुळे २० मार्चपर्यंत शेतीची मशागत होते. त्यानंतर मूग लावला जातो. त्याची काढणी २० जूनपर्यंत व्हावी, असे अपेक्षीत राहते. त्यानंतर मशागत केली, जमिनीला उन मिळाले की त्यानंतर पुन्हा सोयाबीन लागवड होते.

...अशी आहे पीक

उत्पादकता (प्रति एकर)

सोयाबीन : ७ ते ९ क्‍विंटल

हरभरा : १० ते १२ क्‍विंटल

गहू : २० ते २५ क्‍विंटल

मसूर : १२ ते १३ क्‍विंल

मूग : ६ ते ८ क्‍विंटल

मजुरांवरील अवलंबितता कमी करण्यासाठी सोयाबीनची सलग लागवड होते. हंगामअखेरीस हार्वेस्टरचा वापर काढणी, मळणीकामी केला जातो. त्यामुळे उत्पादकता खर्च कमी होतो. त्यानंतर पुन्हा दोन पिके घेतली जातात. त्यामुळे या भागातील पिकाचा पॅटर्न काहीसा फायदेशीर आहे, असे म्हणता येईल.
राव गुलाबसिह लोधी, शासन पुरस्कृत शेतकरी, रा. नन्हेगाव, नरसिंगपूर, मध्य प्रदेश मो. ९३०९५०५४७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com