Soybean Theft Case : सोयाबीन चोरीचा पोलिसांनी २४ तासांत लावला छडा

Soybean Market : औसा एमआयीडीसीतील गोदामात ठेवलेल्या एका शेतकऱ्याच्या शंभर क्विंटल सोयाबीन चोरीचा चोवीस तासाच्या आत छडा लावण्यात पोलीसांना यश आले आहे.
Soybean Market
Soybean Theft Case Agrowon
Published on
Updated on

Latur News : औसा एमआयीडीसीतील गोदामात ठेवलेल्या एका शेतकऱ्याच्या शंभर क्विंटल सोयाबीन चोरीचा चोवीस तासाच्या आत छडा लावण्यात पोलीसांना यश आले आहे. औसा पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक करून त्यांच्याकडून सव्वाचार लाख रुपये किंमतीच्या शंभर क्विंटल सोयाबीनसह एक टेम्पो व जीप जप्त केली आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

पोलिसांनी सांगितले, की औसा एमआयडीसी परिसरातील एका गोदामात शेतकऱ्यांने ठेवलेले शंभर क्विटंल क्विंटल सोयाबीन चोरीला गेले होते. सुमारे दोनशे कट्टे सोयाबीन चोरट्यांनी दोन वाहनांतून चोरी केले आहे. चार लाख ३९ हजार दोनशे रुपयाच्या चोरी प्रकरणी ओसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

पोलिस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलिस अधीक्षक डॉ.अ जय देवरे, औशाचे उपविभागीय पोलिस अधिका कुमार चौधरी यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या नेतृत्वातील सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांच्या पथकाने तत्काळ तपासाची चक्रे फिरवली.

Soybean Market
Soybean Market : शेतकरी सोयाबीन विक्रीपासून वंचित

सोयाबीन चोरणाऱ्यांबद्दल गुप्त माहिती मिळवत अभिषेक सुहास यादव (वय २१, रा. वसवाडी, ता. लातूर), अभय अवधूत भोळे (वय २२, रा, वसवाडी), मनोज राजू खताळ (वय २२, माऊली नगर, पाखरसांगवी, ता. लातूर) व हनुमंत भैरवनाथ मुंडे (वय ३९, रा. टाकळी शिराढोण, जि. धाराशिव) या चौघांना अटक केली.

Soybean Market
MP Soybean MSP: मध्य प्रदेशकडून सोयाबीनसाठी ५६०० रुपये हमीभावाची शिफारस

त्यांच्याकडून चोरीस गेलेले सोयाबीन व गुन्ह्यात वापरलेले टेम्पो व जीप जप्त करण्यात आली आहे. चोरी झाल्यापासून चोवीस तासात कारवाई करत चोरीला गेलेलं सोयाबीन शेतकऱ्यांना परत मिळवून दिले.

पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत असून चोरी गेलेल्या सोयाबीनची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ते शेतकऱ्याला परत केले जाणार आहे. पोलिसांच्या पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक महावीर जाधव, सहायक फौजदार कांबळे, पोलिस अमलदार गुट्टे, मुबाज सय्यद तुमकुटे, श्री. चामे, श्री. पाटील, श्री. भंडे व श्री. मगर यांचा समावेश होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com