Soybean Market : खरेदी केंद्रांवर सोयाबीन देण्यास शेतकरी निरुत्साही

Soybean Procurement : सोयाबीनला हमीभाव मिळावा यासाठी सुरू केलेल्या जिल्ह्यातील पाच केंद्रांवर अवघे १६ हजार क्विंटलची खरेदी झाल्याने जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
Soybean Market
Soybean Market Agrowon
Published on
Updated on

Satara News : सोयाबीन उत्‍पादक शेतकऱ्यांना मागील दोन वर्षांपासून कमी दरामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोयाबीनला हमीभाव मिळावा यासाठी सुरू केलेल्या जिल्ह्यातील पाच केंद्रांवर अवघे १६ हजार क्विंटलची खरेदी झाल्याने जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. अटींच्या फेऱ्यांत अडकलेल्या प्रक्रियेमुळे कमी प्रतिसाद मिळाल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्‍ये आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.या हंगामात सोयाबीन काढणीच्या वेळी शासनाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केली नव्हती.

Soybean Market
Soybean Market : सोयाबीनचे १६९ कोटींचे चुकारे अदा

यामुळे पहिल्या टप्पात पेरणी झालेल्या सोयाबीनची कमी दराने विक्री करावी लागली. शेतकऱ्यांना कमी दर मिळत असल्याने उशीरा का होईना राज्य शासनाने हमीभाव केंद्र सुरू झाली. जिल्ह्यात सातारा, कोरेगाव, कऱ्हाड, मसूर, फलटण, व वाई या ठिकाणी चार महिने ही केंद्र केली.

Soybean Market
MP Soybean MSP: मध्य प्रदेशकडून सोयाबीनसाठी ५६०० रुपये हमीभावाची शिफारस

मात्र एका शेतकऱ्यास एका दिवशी २५ क्विंटल सोयाबीनच खेरदी, १२ टक्के आर्द्रता असलेले, चांगले वाळवलेले असेल तरच खरेदी केंद्रावरील तपासणीत सोयाबीन योग्य आढळले नाही, तर स्‍वखर्चाने माघारी नेणे या अटीमुळे सोयाबीन देण्यास निरुत्साह दिसून आला आहे.

सोयाबीन खरेदीची स्थिती

केंद्र खरेदी (क्विंटल) शेतकरी

कोरेगाव ६,५३३.०० ३७७

फलटण २,९६७.५० २०८

मसूर १०७३.०० ०७१

सातारा १,६८२.५० १४३

वाई ०३५२.०० २५६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com