Orange Variety Research: नागपुरी संत्रा वाणाला पंदेकृवि देणार पर्याय

Punjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth: नागपुरी संत्रा वाणाची मर्यादा लक्षात घेता, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आठ वर्षांच्या संशोधनातून एक नवा पर्यायी वाण तयार केला आहे.
Orange Rate
Orange RateAgrowon
Published on
Updated on

Nagpur News: नागपुरी संत्रा वाणाला पर्याय मिळावा, अशी बागायतदारांची मागणी होती. त्याची दखल घेऊन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी गेल्या आठ वर्षांपासून संशोधनावर लक्ष केंद्रीत केले होते. हे संशोधन आता अंतिम टप्प्यात असून बागायतदारांना लवकरच नव्या संत्रा वाणाचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे.

राज्यात सुमारे दीड लाख हेक्‍टर तर एकट्या विदर्भात एक लाख २५ हजार हेक्‍टर क्षेत्रावर संत्रा लागवड आहे. मात्र रोपवाटिकांमध्ये शास्त्रोक्‍त पद्धतीने व्यवस्थापनाचा अभाव, कलम बांधणीकरिता निकृष्ट दर्जाच्या खुंट (रूटस्टॉक) वापर त्यातूनच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत मोठ्या प्रमाणावर फळगळती होते, असा अनुभव आहे. सध्या असलेल्या नागपुरी संत्रा वाणाची साल पातळ असल्याने त्याची टिकवणक्षमता व उत्पादकता कमी आहे.

Orange Rate
Orange Price: यंदाच्या हंगामात आंबिया बहरातील संत्रा खाणार भाव

गोडी व रसाचे प्रमाण कमी त्यातच बियांची संख्या अधिक त्यामुळे प्रक्रियेकामी देखील या संत्रा वाणाचा अभावानेच वापर होतो. या कारणांमुळे नव्या पर्यायी संत्रा वाणांची बागायतदारांची अनेक वर्षांची मागणी होती. तत्कालीन कृषी सचिव एकनाथ डवले यांनी या पार्श्‍वभूमीवर कृषी विद्यापीठाला संत्रा वाण संशोधन विषयक प्रकल्पासाठी सात ते आठ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली तर उद्यानविद्या विभागाचे प्रमुख डॉ. डी. एम. पंचभाई यांच्या नेतृत्वात या विषयीचा प्रकल्प राबविण्यात आला.

Orange Rate
Orange Farming: संत्रा फळांचा दर्जा, आकार राखण्यासाठी प्रयत्न

आठ वाणांतून झाली एकाची निवड

अकोला, काटोल, नागपूर अशा तीन विभागांत वर्गीकरण करून विदर्भातील ५३४ बागांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. शेतकऱ्यांच्या बागेतील वैशिष्ट्य जपणाऱ्या वाणांपासून रोप तयार करण्यात आली. सुरुवातीला ३३० वाणांवर काम झाले. यातील तीन केंद्रांतील प्रत्येकी दहा वाण वेगळे करून त्यातील पुन्हा आठ वाणांचा अभ्यास करण्यात आला. या आठमधून एक वाण निवडण्यात आले आहे.

२०१७-१८ पासून हे काम सुरू होते. त्यात आता यश आले आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या सूत्रांनी दिली. नागपूर येथील कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर या वाणाची लागवड करण्यात आली असून या वाणाला विद्यापीठस्तरावरील संशोधन समितीने प्रसारणाला पूर्वसंमती दिली आहे. त्यामुळे येत्या संयुक्‍त संशोधन परिषदेच्या बैठकीत हे वाण प्रसारणासाठी ठेवले जाणार असल्याचे सांगण्यात आले. संयुक्‍त संशोधन समितीकडून प्रसारणाला मान्यता मिळताच या वाणाची शेतकऱ्यांच्या शेतावरही लागवड केली जाईल, अशी माहिती देण्यात आली.

अशी आहेत नव्या वाणाची वैशिष्ट्ये

- उत्पादनक्षमता अधिक

- गोलाकार

- तोटी (बेंबी) विरहित

- पातळ साल असल्याने फोडी चिकटून राहतात. त्यामुळे आयुष्य वाढते

- दिसायला चमकदार, गुळगुळीत

- पातळ, जाड साल, त्याची गोडी, ज्यूसचे प्रमाण याची तपासणी प्रयोगशाळेत करण्यात आली

- बियांची संख्या कमी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com