
Hingoli News : जमिनीच्या आरोग्यासह मानवी आरोग्य अबाधित राखण्यासाठी नैसर्गिक शेतीचे महत्त्व आहे. शेतकऱ्यांनी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ विकसित केलेल्या तंत्रज्ञान शिफारशीनुसार तसेच कृषी विज्ञान केंद्रातील विशेषज्ञ यांच्या संपर्कात राहून शेती केली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले.
तोंडापूर (ता. कळमनुरी) येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे विकिसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत असोला (ता. औंढा नागनाथ) येथे आयोजित कार्यक्रमात कदम बोलत होते.
कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी. पी. शेळके, केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ए. तिरुग्नानवेल, डॉ. सुरजित मंडल, पशुवैद्यक आणि पशु विज्ञान महाविद्यालयातील डॉ. सईद अली, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे डॉ. एस. एच. सारंग, डॉ. शिवाजी पोवार, विशेषज्ञ डॉ. अतुल मुराई, अनिल ओळंबे, तुषार गोराड, गुलाबराव सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
डॉ. शेळके म्हणाले, की या कार्यक्रमाद्वारे खरीप हंगामाच्या पूर्व तयारीमध्ये मदत करणे, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणे, शासनाच्या योजनांची माहिती देणे हा आहे. हवामान आधारित पीक सल्ला घेऊन शेतकऱ्यांनी शेती करावी व तसेच शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.
डॉ. ए. तिरुग्नानवेल यांनी लिंबूवर्गीय पिकांचे लागवड तंत्रज्ञान योग्य वेळेवर खत व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, फवारणी करताना घ्यायची काळजी या विषयी माहिती दिली. डॉ. सुरजित मंडल म्हणाले, की माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन करावे.
डॉ. सईद अली म्हणाले, की पावसाळ्यात जनावरांची काळजी घ्यावी. गोठ्याची स्वच्छता व स्वच्छ दूध उत्पादन घ्यावे. डॉ. एस. एच. सारंग म्हणाले, की विद्यापीठाचे नवीन विकसित केलेले सोयाबीन, तूर पिकाचे वाण अनेक बाबतीत सरस आहेत. बीज प्रक्रिया करून पेरणी करावी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.