Animal Care : नवजात वासराचे योग्य व्यवस्थापन

गर्भाशयात वाढणाऱ्या वासराचा आहार (Calf Diet) आणि गर्भाशयातून बाहेर पडलेल्या नवजात वासराच्या आहारात बदल होत असतो. हे लक्षात घेता नवजात वासराला जगण्यासाठी कोलेस्टरम (चीक) पाजणे गरजेचे असते.
Animal Care
Animal CareAgrowon

डॉ.व्ही.एम.सरदार, डॉ.एस. एम.भालेराव

गाय किंवा म्हैस व्यायल्यानंतर सर्वसाधारणपणे नवजात वासराच्या पचनसंस्थेची वाढ पूर्णपणे झालेली असते. परंतु तरीही वासराभोवतीचे वातावरण आणि त्यांच्या आहारावर त्यांच्या पचनसंस्थेची रचनात्मक पुढील वाढ व त्यांचे कार्य अवलंबून असते. कोलेस्टरम हे तात्पुरत्या चयापचय क्रियेसाठी तसेच अंतःस्राव क्रियेसाठी उपयुक्त असते. प्रतिकारक्षमता वाढण्यासाठी उपयुक्त असते.

कोलेस्टरममध्ये असणारे घटक

गाय, म्हशीच्या कोलेस्टरममध्ये पौष्टिक मूलद्रव्य, खनिज पदार्थ, जीवनसत्वे (विशेषतः जीवनसत्वे अ, ड आणि बी), इमिनोग्लोबिन (रोग प्रतिकारक्षमता वाढविणारे घटक), आवश्यक स्निग्ध आम्ल अमायनो आम्ल हे घटक असतात. कोलेस्टरम हे रक्तातील पुष्कळशा अपोषक आणि जैविक क्रियाशील घटकांपासून निर्माण होते. जसे इमिनोग्लोबिन, ग्रोथ हार्मोन, प्रोलॅक्टिन, इन्शुलिन आणि ग्लुकेगॉन. तसेच दुसरे पोषक मूलद्रव्य हे गायी म्हशीच्या सडामधील ग्रंथीमध्ये तयार होतात.

सर्वप्रथम येणाऱ्या कोलेस्टरममध्ये प्रथिने आणि पेप्टाईड यांचे प्रमाण सर्वाधिक असून ते नवजात वासरास देणे गरजेचे असते. पुष्कळ असे अपोषक घटक कोलेस्टरममध्ये उपलब्ध असतात. जसे की, इम्म्युनोग्लोबुलीन, एंझाइम्स, हार्मोन्स किंवा संप्रेरक. हे नवजात वासराच्या वाढीसाठी आवश्यक असतात.

कोलेस्टरममध्ये इन्शुलिन अधिक प्रमाणात असतात. जसे जसे गाई, म्हशींचे दूध देण्याचे प्रमाण वाढत जाते तसे तसे अपोषक अन्नद्रव्याचे प्रमाण कमी कमी होत जाते. गाई, म्हशीमध्ये पुष्कळसे पोषक घटक रक्तापेक्षा कोलेस्टरममध्ये अधिक प्रमाणात असतात.( इमिनोग्लोबिन, इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर). काही पोषक घटक कमी प्रमाणात सुद्धा असतात ( ग्रोथ हार्मोन, ग्लुकॅगॉन, थायरॉक्सिन, केसीन आणि स्टिरॉइड हार्मोन्स)

सर्वसाधारणपणे दुधाळ काळात इन्शुलिन लाईक ग्रुप फॅक्टर, इन्शुलिन, प्रोलॅक्टिन यांचे प्रमाण वाढते. जसे जसे दूध देण्याचे प्रमाण कमी होते तसे वरील घटक क्रमाक्रमाने कमी होत जातात.

Animal Care
Animal Care : जनावरांमध्ये दिसते मिठाची विषबाधा

कोलेस्टरममधील महत्त्वाचे घटक

कोलेस्टरममध्ये मोठ्या प्रमाणात पांढऱ्या पेशी उपलब्ध असतात. यामध्ये जास्त प्रमाणात मायक्रोफेजेस आणि कमी प्रमाणात लिमफोसाईड म्हणजेच टी लिमफोसाईड असतात. कोलेस्टरममधील लुकोसाइट हे एपिथेलियमच्या पियर पॅचेस मधून आतड्याच्या मदतीने शोषले जातात.

जनावरातील कोलेस्टरममध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वसाधारण दुधापेक्षा जास्त असते. जेव्हा कोलेस्टरम आणि दुधातील प्रथिने यांची तुलना केली असता कोलेस्टरम प्रथिने हा जीवशास्त्र क्रियेतील चयापचय क्रियेमध्ये उपयुक्त ठरतो. तसेच कोलेस्टरममध्ये मोठ्या प्रमाणात ग्रोथ फॅक्टर जसे इन्शुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर उपलब्ध असतात. हे पदार्थ नवजात वासराच्या संपूर्ण आतड्यात पसरलेले असतात, त्यांचे फार कमी प्रमाणात आतड्यांद्वारे शोषण केले जाते. याचा उपयोग आतड्यातील पेशींच्या वाढीसाठी होतो.

कोलेस्टरममधील अपोषक घटक हे लहान आतड्यातील चिकट घटकाला उत्तेजित करून लहान आतड्याची शोषण क्रिया वाढवितात. या प्रक्रियेमुळे पोषक मूलद्रव्य आणि साखरेचे शोषण मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळेच वासराच्या शरीरातील साखरेची पातळी वाढते.

कोलेस्टरममध्ये मोठ्या प्रमाणात मायक्रो आरएनए उपलब्ध असतात. यांचे शोषण आतड्याद्वारे होऊन नवजात वासराच्या रक्तात पाठविले जातात. यांचा उपयोग आतड्याच्या पृष्ठभागाचा विकास आणि नवजात वासराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी होतो.

Animal Care
Animal Care: रक्तनमुना मेंढराचा,अहवाल शेळीचा

कोलेस्टरम, दुधाचे जीवशास्त्रीय महत्त्व

नवजात वासराला कोलेस्टरम देणे गरजेचे आहे, परंतु नवजात वासरांना कोलेस्टरमचा उपयोग त्यांच्या अपोषक मूलद्रव्याच्या घटकापासून मिळतो. म्हणूनच नवजात वासरांना लवकर शोषण करणाऱ्या कोलेस्टरमची गरज असते.

नवजात वासराचा मृत्यू हा इसरशिया कोलाय जिवाणूचा प्रादुर्भाव आणि इम्म्युनोग्लोबुलीन कमी झाल्यामुळे होतो. कोलेस्टरम पाजल्याने पचनसंस्थेची क्रिया, रचना आणि त्यांच्या कार्यामध्ये बदल दिसून येतो.

जनावरांच्या कोलेस्टरममध्ये मायटोजनचे प्रमाण नैसर्गिकरित्या मानवापेक्षा जास्त प्रमाणात आढळते. याचा उपयोग पेशींच्या दुप्पटीकरण करणाऱ्या प्रक्रियेमध्ये होतो.

बऱ्याचशा संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की, सर्वसाधारण दुधापेक्षा कोलेस्टरममध्ये अपोषक घटक जास्त प्रमाणात आढळतात. या अपोषक घटकामुळेच पचन संस्था आणि आतड्यातील सूक्ष्मजीवांची संख्या वाढते, त्यांचे स्थलांतर घडून आणण्यास मदत होते, नवीन प्रथिनांची निर्मिती होते. या सर्व कारणांमुळे नवजात वासराच्या पचनसंस्थेची क्रिया (हालचाल), रोगप्रतिकारशक्ती आणि त्यांचे कार्य जोमाने वाढते. या सर्व आंतरक्रियेमुळे नवजात वासराची अन्नपोषक द्रव्यात रूपांतर करण्याची प्रक्रिया, संप्रेरक संस्था, रक्तवाहिनीची गती, वासराची वाढ आणि त्यांची वर्तणूक यासाठी उपयुक्त ठरते.

जठर आणि आतड्यावर कोलेस्टरमचा प्रभाव

नवजात वासराचे पोट / जठर हे एक कप्पा क्रियाशील घटक असून पूर्ण लहान-मोठे आतड्यांची वाढ झालेली असते. आतड्याचा बदल हा त्यांच्या पचन संस्थेची परिपक्वता दर्शवितो. ज्यामध्ये जठरांसोबत पॅनक्रिया आणि लिव्हर यांची सुद्धा क्रियाशक्तीची परिपक्वता झाली असे समजते.

सर्वसाधारणपणे सहा ते सात दिवसानंतर मोठ्या प्रमाणात प्रथिने आणि पेप्टाईडचे शोषण आतड्याद्वारे केले जाते. ज्यात प्रथिनांचे पचन लायसोसोमद्वारे आतड्याच्या पोकळीतील इन्टेस्टाइनमध्ये केले जाते. जेव्हा अपोषक घटक कमी प्रमाणात दिले जातात, तेव्हा नवजात वासराची पचन संस्था कमजोर होण्यास सुरवात होते. विकृती व मरतुकीचे प्रमाण वाढते.

नवजात वासराला गायीपासून वेगळे करणे

नवजात वासरात कोलेस्टरमचे नियोजन आणि वासराचा संतुलित आहार यावर लक्ष देणे आवश्यक आहे. वासरांना वेगवेगळ्या आजारापासून वाचविणे अत्यंत महत्त्वाचे असते.

कोलेस्टरमचे चांगले नियोजन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ज्यामुळे आपण वासरामधील विकृती आणि मरतुकीचे प्रमाण कमी करू शकतो.

नवजात वासरांना गर्भाशयातून बाहेर आल्यानंतर कोलेस्टरम पाजणे गरजेचे असते. कारण त्यामध्ये बरेचसे महत्त्वाचे घटक द्रव्य उपलब्ध असतात.

आधुनिक दूध व्यवसायात सर्वसाधारणपणे २४ तासात नवजात वासरांना गाईपासून वेगळे गेले जाते. कारण यामुळे नवजात वासरांना काही रोगांपासून वाचविले जाऊ शकते जसे की क्षयरोग आणि शेणापासून होणारे आजार. काही संशोधनात आढळून आले आहे की २४ तासानंतर नवजात वासरांना वेगळे केल्याने वासरांच्या हाडांची वाढ खुंटते आणि आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. हे लक्षात घेता एक ते दोन आठवड्यानंतर नवजात वासरांना वेगळे करावे. याकाळात वासराची रोगप्रतिकारशक्ती वाढलेली असते. या काळानंतर वासरांची रवंथ करण्याची प्रक्रिया सुधारलेली असते. या काळानंतरच गायी सुद्धा वासरांकडे पूर्णतः दूध पाजण्यास दुर्लक्ष करायला लागतात.

- डॉ.व्ही.एम.सरदार, ९९२२५११३४४

( पशुशरीरक्रिया शास्त्र,क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यक महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com