Animal Care : जनावरांमध्ये दिसते मिठाची विषबाधा

जनावरांच्या आहारात समतोल प्रमाणात मिठाचा वापर करावा. जास्त प्रमाणात मिठाचा वापर जाल्यास जनावरांना विषबाधा होते. यामुळे जनावरांची भूक मंदावते. सतत तहान लागते, लाळ गाळते. ही लक्षणे ओळखून तातडीने उपाययोजना कराव्यात.
Animal Care
Animal CareAgrowon

डॉ. विकास कारंडे, डॉ. बाबासाहेब घुमरे

माणसाप्रमाणेच जनावरांच्या आहारात मीठ (Salt In Animal Feed) हा आवश्यक घटक आहे. जनावरांच्या खाद्यात (Animal Feed) मिठाचा वापर खाद्याची चव वाढीसाठी आणि खाद्य पूर्णपणे खाल्ले जावे म्हणून करतात. चवीसाठी थोड्या प्रमाणात मीठ वापरल्यास फायदाच होतो. पण बऱ्याच वेळा पशुपालक चुकून मिठाचा वापर जास्त करतात. कोणत्याही पदार्थाचे अतिरिक्त सेवन हे घातक असते. त्याचप्रमाणे मिठाचे सुद्धा आहे. जनावरांच्या आहारात (Animal Diet) मिठाच्या अतिरिक्त वापरामुळे जनावरांच्या शरीरावर घातक परिणाम होतो. मिठाच्या अतिरिक्त वापरामुळे विषबाधा (Poisoning) होते.

विषबाधेची कारणे ः

१) जनावरांच्या आहारात मिठाचा वापर अतिरिक्त प्रमाणात वापर.

२) जास्त प्रमाणात मीठ असणारे खाद्य पदार्थ जनावरांकडून अपघाताने खाल्ले गेल्यास

३) मासळीयुक्त खाद्याचे अतिरिक्त सेवन.

४) ‘इ’ जीवनसत्त्व तसेच गंधकाची आहारातील कमतरता.

५) मीठयुक्त आहार दिल्यानंतर पिण्यास योग्य प्रमाणात पाणी पिण्यास न देणे.

मीठयुक्त खाद्य पदार्थांनंतर योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यास जनावरांमध्ये विषबाधा आढळून येत नाही. शरीरात जेव्हा अतिरिक्त मीठ खाल्ल्याने रक्तामध्ये सोडिअमचे प्रमाण वाढते त्या वेळी अतिरिक्त सोडिअम लघवी वाटे बाहेर टाकले जाते. हे सोडिअम बाहेर टाकण्यासाठी पाण्याची गरज असते. अशावेळी पाणी न मिळाल्यास मिठाची विषबाधा आपणास पाहावयास मिळते.

Animal Care
Animal Care : कासदाह आजारावर घरच्याघरी उपचार कसे कराल?

विषबाधेची प्रक्रिया :

१) अतिरिक्त मिठाच्या सेवनामुळे सोडिअम आणि पाणी या दोन घटकांमधला समतोल ढासळतो. त्यामुळे जास्त झालेले सोडिअम आतड्यामध्ये दाह निर्माण करत असते. त्यामुळे जनावरांच्या आतड्यांची हालचाल वाढून जनावरांना हगवण लागणे, शरीरातील पाणी कमी होते.

२) अतिरिक्त सोडिअममुळे किडनीवर सुद्धा घातक परिणाम दिसू लागतो. त्यामुळे शरीरातून टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे मुख्य काम बिघडू लागते. यामुळे शरीराला सूज येणे, तसेच मेंदू व चेतासंस्थेवर विपरीत परिणाम दिसून येते. जनावर वेड्यासारखे वागू लागते.

Animal Care
Animal care : जातिवंत वळूची शास्त्रीय तपासणी महत्वाची

लक्षणे:

१. जनावरांची भूक मंदावते.

२. सतत तहान लागते, लाळ गळते.

३. सुरुवातीला हगवण (पातळ शेण) व नंतर बद्धकोष्ठता (कठीण शेणाचे गोळे) होते.

४. सुरुवातीला जनावर सतत लघवी करते आणि नंतर लघवी बंद होते.

५. नाकातून पाणी येते, नाडीचे ठोके मंद होतात.

६. शरीराचे तापमान साधारण असते, पण त्वचा तसेच नाक थंड पडते.

७. स्नायूमध्ये ताठरता येते. जनावर अस्वस्थ होऊ लागते.

८. जनावर आंधळ्यासारखे करू लागते, धडपडते. मागील बाजूस सरकण्याचा व चालण्याचा प्रयत्न करते.

९. पायाने जमीन उकरते, गोल गोल फिरते, पाय झाडते, थरथरते झटके देते.

१०. एका बाजूस पडते, बेशुधावस्थेमध्ये जाऊन दगावते.

निदान कसे करावे?

१) मिठामुळे जनावर आजारी आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी जनावराच्या खाण्याबद्दल, आहाराबद्दल पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.

२) महत्त्वाची लक्षणे जसे, की अतिरिक्त तहान लागणे, चेतसंस्थेवरील परिणाम, जनावराच्या वागणुकीतील हिंसक बदल, मरणोत्तर अहवाल या गोष्टीवरून निदान करणे शक्य होते.

उपचार आणि प्रतिबंध ः

१) विषबाधेची लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करून जनावरांच्या आहाराबद्दल तसेच

लक्षणाबद्दल पूर्ण माहिती द्यावी. कोणतीही गोष्ट पशुवैद्यकांपासून लपवून नये.

२) मिठाच्या विषबाधेस ठरावीक असे उपचार नाहीत, परंतु पशुवैद्यक लक्षणानुसार योग्य ते उपचार करू शकतात.

३) जनावरांच्या आहारात मिठाचे प्रमाण अतिरिक्त असू नये. मीठ असणारे खाद्य अतिप्रमाणात देऊ नये. उदा. मिठात साठवलेले मासळीयुक्त खाद्य (फिश मिल).

३) मिठाच्या विषबाधेची लक्षणे दिसल्यास एकदम जास्त प्रमाणात पाणी न देता थोड्या थोड्या प्रमाणात पाणी द्यावे.

संपर्क ः

डॉ. विकास कारंडे, ९०२९८०२३२३

डॉ. बाबासाहेब घुमरे, ९४२१९८४६८१

(औषधशास्त्र व विषशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ, जि. सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com