Animal Husbandry : पशुपालनात नियोजन, व्यवस्थापनाला प्राधान्य

Animal Husbandry Management : नगर तालुक्यातील शेंडी येथील शिंदे यांचे एकत्रित कुटुंब. नीलेश शिंदे, चंद्रकांत शिंदे, धनेश्वर शिंदे व सचिन शिंदे हे भाऊ एकत्रित शेती आणि पशुपालन करतात.
Animal Husbandry
Animal HusbandryAgrowon
Published on
Updated on

Animal Husbandry Farmer Management :

शेतकरी नियोजन

पशुपालन

शेतकरी : नीलेश नंदू शिंदे

गाव : शेंडी, ता. जि. नगर

एकूण गाई : २८ गाई, २३ कालवडी

एकूण म्हशी : १९ म्हशी व १० (लहान म्हशी)

नगर तालुक्यातील शेंडी येथील शिंदे यांचे एकत्रित कुटुंब. नीलेश शिंदे, चंद्रकांत शिंदे, धनेश्वर शिंदे व सचिन शिंदे हे भाऊ एकत्रित शेती आणि पशुपालन करतात. दुग्ध व्यवसायात टप्प्याटप्प्याने वाढ करत प्रगती साधली आहे. पशुपालनात नियोजन, व्यवस्थापनाला विशेष प्राधान्य शिंदे कुटुंबीय देतात.

शिंदे बंधूंनी २०१९ मध्ये १२ गाईंची खरेदी करत गोपालन सुरु केले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने गाईंच्या संख्येत वाढ केली. सध्या त्यांच्याकडे २८ गाई आणि २३ कालवडी आहेत. म्हैसपालन तर सुरवातीपासूनच आहे. त्यातही वाढ केली. सध्या प्रतिदिन गाईंचे ४२० लिटरपर्यंत, तर म्हशींचे १५० लिटरपर्यंत दूध संकलन होते. गाईच्या दुधाची खासगी डेअरीला, तर म्हशीच्या दुधाची नगर शहरात ग्राहकांना थेट विक्री केली जाते.

Animal Husbandry
Animal Husbandry : खाद्य, आरोग्य व्यवस्थापनातून यशस्वी पशुपालन

व्यवस्थापनातील बाबी

दुग्ध व्यवसायात जनावरांचे तसेच गोठ्याचे योग्य व्यवस्थापन, आरोग्य, स्वच्छता या बाबींवर कटाक्षाने लक्ष दिले जाते. दुग्ध व्यवसायात काटेकोर व्यवस्थापनावर अधिक भर दिल्यास व्यवसाय फायदेशीर ठरतो असा त्यांचा अनुभव आहे.

गाईंसाठी मुक्त संचार पद्धतीच्या विस्तीर्ण गोठ्याची उभारणी केली आहे.

गाईंच्या दुधाची दररोज पहाटे ४ वाजता, दुपारी १२ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता अशी तीन वेळा काढणी केली जाते. म्हशींच्या दुधाची सकाळी ६ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता अशी दोन वेळा काढणी केली जाते.

मुक्त गोठ्यातील गाई दूध काढणीसाठी दावणीला बांधल्या जातात. संपूर्ण दूध काढणी यंत्राच्या साह्याने केली जाते. दूध काढणी पूर्ण झाल्यावर गाईंना चारा व खुराक दिला जातो. सकाळच्या टप्प्यातील ही कामे साधारण सकाळी आठ वाजेपर्यंत पूर्ण होतात. पुन्हा दुपारी आणि सायंकाळी सकाळप्रमाणेच दूध काढणी आणि अन्य कामांचे नियोजन केले जाते.

मुक्तसंचार गोठ्यात पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था केलेली आहे.

Animal Husbandry
Animal Husbandry : म्हशींच्या संगोपनात खाद्य, आरोग्य व्यवस्थापनावर भर

आहार, आरोग्य व्यवस्थापन

प्रत्येक गाईला व म्हशीच्या खाद्य व्यवस्थापनावर विशेष लक्ष दिले जाते. खाद्यामध्ये प्रामुख्याने मुरघास, गवत कुट्टी तसेच पशुखाद्य दिले जाते. पशुखाद्यामध्ये गोळीपेंड, सरकी पेंड, मका भरडा यांचा समावेश असतो.

लम्पी, लाळ्या खुरकूत या आजाराचे प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यावर भर दिला जातो. दर सहा महिन्यांनी हे लसीकरण केले जाते.

मोठ्या गाईंना जंताच्या वर्षातून दोन वेळा, तर लहान वासरांना तीन महिन्यातून एकदा मात्रा दिल्या जातात.

लाळ्या खुरकूत, लम्पी त्वचा आजार, फऱ्या, घटसर्प यांचे लसीकरण प्राधान्याने केले जाते. नुकतेच घटसर्प, फऱ्या, लाळ्या खुरकुताचे आठ दिवसांपूर्वी, तर महिनाभरापूर्वी लम्पीचे लसीकरण केले आहे.

नवजात वासरांची काळजी

लहान वासरांची विशेष काळजी घेतली जाते. नवजात वासरांची स्वतंत्र संगोपन केले जाते. त्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे.

वासरांच्या वाढीसाठी आवश्यक तो खुराक दिला जातो. नवजात वासरांची वाढ चांगली होण्यासाठी दूध पाजण्यासह खाद्य व्यवस्थापनावर विशेष भर दिला जातो.

शेतामध्ये शेणखताचा वापर

पशुपालनातून वर्षभरात सुमारे ८० ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. शिंदे कुटुंबाची एकत्रित ४० एकरांपर्यंत शेती आहे. घरच्या शेतीमध्ये उपलब्ध शेणखताचा वापर करण्यावर भर दिला जातो. चारा पिकांच्या लागवडीमध्ये शेणखताचा वापर केल्यामुळे चारा पिकांची दर्जेदार वाढ होण्यास मदत झाली. शिवाय इतर हंगामी पिकांसह फळपिकांमध्ये देखील उत्पादनवाढीस फायदा होतो.

चारा पिकांच्या लागवडीमधून दरवर्षी सुमारे १५० टनांपर्यंत मुरघास निर्मिती केली जाते. त्यासाठी शेतामध्ये मका लागवडीवर भर दिला जातो. चारा टंचाईच्या काळात मुरघासाची चांगली मदत होत असल्याचे शिंदे कुटुंबीय सांगतात.

नीलेश शिंदे, ८४५९९३०००५

(शब्दांकन : सूर्यकांत नेटके)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com