Animal Husbandry : खाद्य, आरोग्य व्यवस्थापनातून यशस्वी पशुपालन

Livestock Management : कोल्हापूर शहरापासून सुमारे ४० किलोमीटरवर जयसिंगपूर हे शहर आहे. शहरातील शशिकांत विजय बेले यांनी स्वतःची काहीच शेतजमीन नसताना १४ जनावरांचा गोठा उभारला आहे.
Livestock
LivestockAgrowon
Published on
Updated on

Animal Husbandry Farming Management :

शेतकरी नियोजन

पशुपालन

शेतकरी : शशिकांत विजय बेले

गाव : जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर

एकूण गाई : १४

कोल्हापूर शहरापासून सुमारे ४० किलोमीटरवर जयसिंगपूर हे शहर आहे. शहरातील शशिकांत विजय बेले यांनी स्वतःची काहीच शेतजमीन नसताना १४ जनावरांचा गोठा उभारला आहे. गाईंसाठी सर्व चारा विकत आणून देखील गोठा व्यवसायात प्रगती साधली आहे.

शशिकांत बेले यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पुढे काय करायचे असा प्रश्न वीस वर्षांपूर्वी निर्माण झाला. याचवेळी पशुपालन करण्याचा पर्याय समोर दिसला. पण शेती नसल्याने जनावरांचे व्यवस्थापन करणे आव्हानात्मक होते. सुरवातीला एका गाईपासून व्यवसायाची सुरुवात केली. सुरवातीपासूनच वैरण विकत आणून चाऱ्याचे नियोजन सुरू झाले.

हळूहळू व्यवसायात जम बसत गेल्यानंतर गोठ्यातील गाईंची संख्या वाढवत नेली. दररोज पहाटे पाच वाजता गोठ्यातील कामांना सुरुवात होते. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत गोठ्याची स्वच्छता, दूध काढणे त्यानंतर चारा व पशुखाद्य देणे असा दैनंदिन दिनक्रम असतो. गोठ्यातील कामांमध्ये शशिकांत यांना पत्नी सौ. जयश्री, वडील विजय व आई सुशीला यांची मदत मिळते. कुटुंबाच्या साथीने शशिकांत यांना दुग्धव्यवसायात चांगले यश मिळाले आहे.

Livestock
Animal Husbandry : संकटावर मात करत शोधला पशुपालनाचा मार्ग

चारा नियोजन

गोठ्यातील गाईंना लागणारा सर्व चारा व्यापारी व शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधून विकत आणला जातो. वर्षभराच्या नियोजनानुसार जसा उपलब्ध होईल तसे टनांमध्ये चाऱ्याची खरेदी केली जाते. यामध्ये हिरव्या व सुक्या चाऱ्याची खरेदी होते.

हिरव्या चाऱ्यामध्ये उसासह ज्वारी व मका खरेदी केला जातो. तर सुक्या चाऱ्यामध्ये कडबा कुट्टी खरेदी केली जाते.

गोठ्यातील मोठ्या गाईंना प्रतिदिन ३० किलो हिरवा चारा दिला जातो. त्यात सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी १५ किलो प्रमाणे असे नियोजन असते.

वासरांना दोन्ही वेळचा मिळून १५ किलो हिरवा चारा दिला जातो.

गाई विकत आणण्यापेक्षा गोठ्यातच कृत्रिम रेतनाद्वारे गाईंची पैदास करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे नवीन गाई खरेदीचा आर्थिक भार कमी होतो. गाईंच्या संख्येत वाढ होईल, तसे अधिकच्या चारा खरेदीचे नियोजन केले जाते.

पशुखाद्यामध्ये गोळी पेंड, सरकी पेंड, मका, गहू भुस्सा आदींचा वापर होतो. एका गाईला दिवसाला दहा किलो पशुखाद्य दिले जाते. सकाळी व संध्याकाळी दूध काढण्यापूर्वी पशुखाद्य देण्याचे नियोजन असते.

Livestock
Animal Husbandry : संकटावर मात करत शोधला पशुपालनाचा मार्ग

लसीकरणावर भर

गोठ्यातील गाईंच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. गाईंना नियमितपणे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून लसीकरण केले जाते. त्यात विशेषतः लाळ्या खुरकूत, लम्पी त्वचा आजार व घटसर्प यांचे प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाते. गोठा स्वच्छ असेल तर गाईंचे आरोग्य निश्चित चांगले राहत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.

दुग्धोत्पादन

गोठ्यातील एकूण गाईंपैकी किमान सात जनावरे वर्षभर दूध देतील असे नियोजन केले जाते. गाभण आणि दूध देणाऱ्या गाई यामध्ये संतुलन राखले जाते. सहा गाईंचे मिळून प्रतिदिन साधारण ९० लिटरपर्यंत दूध संकलन होते. एकूण दूध उत्पादनापैकी सुमारे ६५ लिटर दूध सहकारी संघाला दिले जाते. तर २५ लिटर दुधाची थेट ग्राहकांना विक्री केली जाते. संघाला दिलेल्या प्रतिलिटर दुधास साधारण ३५ रुपयांच्या आसपास दर मिळतो. तर थेट ग्राहक विक्री केलेल्या दुधास ४५ रुपये प्रतिलिटर इतका दर मिळतो. दूध काढल्यानंतर लगेचच अर्ध्या तासामध्ये ताजे २५ लिटर दूध ग्राहकांना घरपोच पुरविले जाते.

उन्हाळ्यातील नियोजन

मागील काही दिवसांपासून उन्हामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे गाईंच्या संगोपनात आणि नियमित नियोजनामध्ये बदल करण्यात आला आहे. वाढत्या उष्णतेमुळे गाईंच्या शरीरावर ताण येण्याची शक्यता असते. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यासाठी गाईंची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून दूध उत्पादनात घट येणार नाही.

गोठ्यामध्ये गारवा राहावा यासाठी पंखे लावले आहेत.

गाईंचे आरोग्य चांगले राहावे यासाठी पशुखाद्यामध्ये मीठ व खनिज मिश्रणांचा समावेश केला जातो. दररोज सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी ५० ग्रॅम खनिज मिश्रण पशुखाद्यामध्ये घालून दिले जात आहे.

गाईंच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहावे, यासाठी त्यांच्यावर पाण्याचा शिडकाव केला जातो. त्यांना मुबलक आणि स्वच्छ पाणी पिण्यासाठी उपलब्ध केले जाते.

शशिकांत बेले, ९०७५१०५१११

(शब्दांकन : राजकुमार चौगुले)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com