Lumpy Skin : ‘लम्पी’ आजाराबाबत सूक्ष्म नियोजन करा

लम्पी आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होऊ नये. झाली तर मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवारी (ता. ४) दिल्या.
Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon
Published on
Updated on

सोलापूर ः राज्यामध्ये लम्पी आजाराने (Lumpy Skin Disease) आतापर्यंत २१०० जनावरांचा मृत्यू झाला आहे. लम्पी आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होऊ नये. झाली तर मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radha-Krushna Vikhe Patil) यांनी मंगळवारी (ता. ४) दिल्या.

Lumpy Skin
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’ने दगावलेल्या सर्व जनावरांसाठी आता मदत

नियोजन भवन येथे लम्पी आजाराबाबत राज्य टास्क फोर्सच्या बैठकीत श्री. विखे-पाटील बोलत होते. बैठकीला आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, रणजितसिंह मोहिते-पाटील, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. बिकाणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते,

Lumpy Skin
Lumpy Skin : मृत जनावरांच्या मालकांना मदतीसाठीच्या अटी रद्द

पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सोनवणे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे आदी उपस्थित होते. श्री. विखे-पाटील म्हणाले, की राज्यात गाय वर्गीय जनावरांना लम्पी आजार होऊन त्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे.

Lumpy Skin
Lumpy Vaccination : लोकसहभागातून ६४ हजारांवर पशुधनाचे लसीकरण

यावर टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांनी संशोधन करून मृत्यू नेमका होण्याची कारणे शोधून उपाययोजना काय कराव्यात, हे सुचवावे. जनावरांचा मृत्यू होऊ देऊ नका. बरी झालेली जनावरे लम्पी आजार न झालेल्या जनावरांमध्ये मिसळणार नाहीत,

Lumpy Skin
Lumpy Vaccination : सिंधुदुर्गमध्ये ६४ टक्के जनावरांचे लसीकरण

याबाबत काळजी घ्यावी. टास्क फोर्सने राज्यातील सर्व जिल्हानिहाय पशुवैद्यकीय अधिकारी, डॉक्टर यांची ऑनलाइन कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करावे, असेही श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.पंधराव्या वित्त आयोगातून ॲम्ब्युलन्स घ्याव्यातजिल्ह्यात लसीकरणासाठी वाहनांची आवश्यकता असल्यास १५ व्या वित्त आयोगातून ॲम्ब्युलन्स घेता येतील.

शिवाय जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे असलेल्या विना चालक रुग्णवाहिका तीन महिन्यासाठी घ्याव्यात. या रुग्णवाहिका लसीकरणासाठी वापरता येतील. पशुधन जास्त असलेल्या तालुक्यात दोन रुग्णवाहिका वापरून लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या

सूचना श्री. विखे-पाटील यांनी दिल्या.

‘लम्पी’चा प्रभाव कमी होतोयआयुक्त प्रतापसिंह यांनी सांगितले, की राज्यात एक कोटी ४० लाख जनावरे असून, एक कोटी १५ लाख लस उपलब्ध झाली आहे. सर्वांना वेगाने लसीकरण सुरू असून, एक कोटी आठ लाख जनावरांचे लसीकरण झाले आहे.

सध्या ५२ हजार पशू बाधित असून २१०० जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एकाही म्हशीचा समावेश नसल्याने म्हशीची वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली. वेळेत निर्णय आणि गतीने लसीकरण सुरू केल्याने दोन हजार गावात लम्पी कमी होतोय.

अत्यवस्थ जनावरे कमी होत आहेत, सध्या किरकोळ आजाराचे रूग्ण आढळून येत आहेत असे सांगितले.पशुपालकांना अर्थसाह्यलम्पी आजारामुळे जनावरे दगावलेल्या सोलापूर जिल्ह्यातील दहा पशुपालक लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते मृत्यू पडलेल्या प्रत्येक संकरित गायीच्या पशुपालकांसाठी तीस तर खिलार बैलापोटी पंचवीस हजार रुपये याप्रमाणे धनादेशाचे वितरण करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com