Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon

Lumpy Skin : मृत जनावरांच्या मालकांना मदतीसाठीच्या अटी रद्द

लम्पी स्कीन आजाराने मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना मदत दिली जाणार आहे.
Published on

सांगली : लम्पी स्कीन आजाराने (Lumpy Skin Disease) मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना मदत दिली जाणार आहे. त्यासाठी अल्प किंवा अत्यल्प भूधारक असण्याची आणि जनावर संख्या मर्यादेची अट रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी (Dr. Raja Dayanidhi) यांनी दिली.

Lumpy Skin
Lumpy Vaccination : सिंधुदुर्गमध्ये ६४ टक्के जनावरांचे लसीकरण

ते म्हणाले, की जिल्ह्यात गायवर्गीय ३ लाख २४ हजार ७५६ व म्हैसवर्गीय पशुधन ४ लाख ९३ हजार ९५८ आहे. ३ ऑक्टोबरअखेर लम्पी स्कीन रोगाचे ५९८ पशुधन बाधित झाले. २२ मृत झाले. ३४४ पशुधनामध्ये सौम्य, ५३ पशुधनात मध्यम व १९ पशुधनामध्ये गंभीर प्रादुर्भाव आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin : सात जिल्ह्यांत मृत जनावरांच्या संख्येने ओलांडली शंभरी

बाधीत पशुधनापैकी १६० पशुधन पूर्ण बरे झाले आहे. ३ लाख २२ हजार ६४८ गायवर्गीय पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे. गायवर्गीय पशुधनाच्या तुलनेत लसीकरणाची टक्केवारी ९९ टक्के आहे. दोन दिवसांत १०० टक्के लसीकरण पूर्ण होईल.

Lumpy Skin
Lumpy Skin : सोलापुरात ‘लम्पी’चा वाढता विळखा

जिल्ह्यात एकूण ५४ पशुधन पर्यवेक्षकांची नेमणूक कंत्राटी पद्धतीने करण्यात आली आहे. ३ सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी यांच्या नियुक्त्या फिरत्या पशुचिकित्सा पथकांकडे करण्यात आल्या आहेत. तसेच १८ पशुधन विकास अधिकारी सुद्धा कंत्राटी पद्धतीने भरण्याची कार्यवाही सुरू आहे, असे डॉ. दयानिधी यांनी सांगितले.

लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित

डॉ. राजा दयानिथी म्हणाले, की पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ई-केवायसीचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांनी मोबाइलवरून किंवा नजीकच्या सेवा केंद्रात जाऊन नोंदणी करावी. आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांपैकी ७५ टक्के शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. १ लाख ९ हजार शेतकऱ्यांची नोंदणी अद्याप प्रलंबित आहे. ती त्वरित करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com