Lumpy Vaccination : लोकसहभागातून ६४ हजारांवर पशुधनाचे लसीकरण

या आजारातून ८८ जनावरे बरी झाली आहेत. मानवत तालुक्यात १ बैलाचा मृत्यू झाला. सध्या ९ जनावरांवर उपचार सुरू आहेत.
Lumpy Vaccination
Lumpy VaccinationAgrowon

परभणी ः जिल्ह्यतील पाच तालुक्यांतील ३२ गावांतील ९८ जनावरांना लम्पी स्कीन (Lumpy Skin) आजाराचा प्रादुर्भाव झाला. या आजारातून ८८ जनावरे बरी झाली आहेत. मानवत तालुक्यात (Manvat Village Lumpy) १ बैलाचा मृत्यू झाला. सध्या ९ जनावरांवर उपचार सुरू आहेत.

Lumpy Vaccination
Lumpy Vaccination : सिंधुदुर्गमध्ये ६४ टक्के जनावरांचे लसीकरण

परभणी जिल्ह्यात गायींची संख्या १ लाख ३७ हजार १५०, बैलांची संख्या १ लाख ६२ हजार ७११ आणि म्हशींची संख्या ९८ हजार ४९५ आहे. लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव जिल्ह्यातील ८४९ पैकी ३२ गावांतील जनावरांना झाला आहे.

बाधीत गावांपासून ५ किलोमीटर परिघातील १५६ गावांतील जनावरांची एकूण संख्या ८१ हजार ६२२ आहे. त्यात २७ हजार १९ गायी आणि ३० हजार ६८६ बैल आहेत. या आजाराचा प्रसार टाळण्यासाठी एकूण ७७ हजार ९२४ गोवर्गीय जनावरांचे तत्काळ लसीकरण करण्यात येत आहे. त्यात ३६ हजार ७ गाई आणि ४१ हजार ९१७ बैलांचा समावेश आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com