
Livestock Management : शेती आणि पशुपालनामुळे, वातावरणाच्या तापमानवाढीला कारणीभूत ठरणाऱ्या मिथेन वायूचे उत्सर्जन होते. मिथेन हा कार्बन डायऑक्साइडपेक्षाही जास्त प्रभावी हरितगृह वायू आहे. वातावरणात याचे प्रमाण वाढल्यामुळे, जनावरांचे आरोग्य आणि शेतीवर विपरीत परिणाम होत आहे.
मिथेन उत्सर्जनाची कारणे
दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियायी देशांमध्ये पशुपालन हे उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. कृषी उत्पादनात निम्म्याहून अधिक योगदान देते. हे क्षेत्र कृषी कार्यासाठी ऊर्जेचा प्राथमिक स्रोत आणि मानवासाठी प्राणी प्रथिनांचा प्रमुख स्रोत आहे.
मर्यादित संसाधनांचा काळजीपूर्वक आणि शाश्वत वापर तसेच कमी हरितगृह वायू उत्सर्जन यांच्यात समतोल साधला पाहिजे. जागतिक तापमानवाढीचे दुष्परिणाम कमी करताना पशुपालनाचे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य उपक्रमांमध्ये रूपांतर करण्यासाठी आणि योग्य उपाय शोधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे.
कार्बन डायऑक्साइड, मिथेन, वातावरणातील नायट्रस ऑक्साइड यांच्या तीव्रतेमध्ये आणि एकाग्रतेत वाढ झाल्यामुळे तापमानामध्ये वाढ होते. भारत हा चीन आणि अमेरिकेनंतर जगातील तिसरा सर्वांत मोठा हरितगृह वायू उत्सर्जित करणारा देश आहे. वातावरणातील हरितगृह वायूंचे प्रमाण वाढल्यामुळे जागतिक तापमान वाढ होत आहे. जागतिक उत्सर्जन कमी करण्यात आणि भविष्यातील हवामान निश्चित करण्यात भारताची प्रमुख भूमिका आहे.
शरीरांतर्गत आंतरीक मिथेन कमी करण्याचे पर्याय तीन सामान्य श्रेणींमध्ये येतात. जसे की सुधारित आहार पद्धती, विशिष्ट प्रकारच्या पूरक खाद्य पदार्थांचा वापर आणि पशु व्यवस्थापन तसेच प्रजननातील बदल.
बहुसंख्य भारतीय पशुधन संगोपन हे खुल्या गायरान चराईवर आणि भटकंतीवर आधारित आहे. पाचक प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात मिथेन तयार होतो. ज्यामध्ये कर्बोदकांमध्ये सूक्ष्मजीवांद्वारे साध्या रेणूंमध्ये विघटन केले जाते, जेणेकरून रवंथ करणाऱ्या जनावरांच्या रक्तप्रवाहात शोषले जाते. तथापि, मोठ्या प्रमाणात जनावरे कमी उत्पादन आणि अवर्णीत जातीची आहेत. भारतातील पशुधन उत्पादनावर हवामान बदलाच्या परिणामांबद्दलच्या चिंता जास्त आहेत.
भारतातील मिथेन उत्सर्जनाचे स्रोत
जनावरांच्या पोटातील पचनाच्या प्रक्रियेमध्ये होणारे आंतरिक किण्वन.
भातशेती, ऊर्जा क्षेत्र, माती.
खत व्यवस्थापन.
पिकांचे अवशेष जाळणे.
पशुधनाच्या माध्यमातून उच्चस्तरीय उत्सर्जन तीव्रतेची मुख्य कारणे
पशुखाद्याची खराब गुणवत्ता (कमी खाद्य पचनक्षमता)
पशुखाद्याच्या खराब गुणवत्तेमुळे उच्च आंतरिक मिथेन उत्सर्जन आणि कमी पशू उत्पादन क्षमता होत आहे. सरासरी खाद्याची पचनक्षमता तुलनेने कमी म्हणजे ५४ टक्के आहे. कमी पचण्याजोगे खाद्य प्रति युनिट ऊर्जेमध्ये जास्त मिथेन उत्सर्जन निर्माण करते.
उत्पादन नसलेल्या जनावरांचा प्रभाव.
उत्सर्जनात योगदान देणारे जनावरे पण उत्पादनात नाही, ज्यामुळे उत्सर्जनाची तीव्रता जास्त असते.
मिथेन उत्सर्जनाचा जनावर,
मानवावर होणारे परिणाम
पृथ्वीच्या पृष्ठभागावर तसेच समुद्रसपाटीवरील सर्वसाधारणपणे तापमानामध्ये १.५ ते २.५ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.
अवकाळी पावसाचे प्रमाण वाढत आहे. पर्जन्यमानाच्या ऋतूमध्ये बदल होताना दिसत आहे.
रोगांचा प्रसार झपाट्याने वाढताना दिसत आहे.
पशुमध्ये परजीवींपासून प्रसार होणाऱ्या रोगांचा प्रसार वाढत आहे. नवीन रोगांचा उदय आणि प्रसार वाढत आहे.
अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. शेती आणि पशुधन हे सर्वांत हवामान संवेदनशील क्षेत्र आहे.
दूध, मांस आणि लोकर उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण कमी होत आहे.
वाढत्या तापमानाचा त्रास होऊन पशू आहारचे सेवन कमी होऊन एकंदर कार्यक्षमता कमी होत आहे.
अन्न असुरक्षितता निर्माण होऊन याचा सर्वाधिक फटका विकसनशील देशांना बसत आहे.
हवामान बदलाचे पशुधनावर होणारे परिणाम
पाण्याच्या उपलब्धतेत बदल.
खाद्याचे प्रमाण आणि गुणवत्तेवर परिणाम.
खाद्य पचनक्षमता आणि पौष्टिक गुणवत्तेवर परिणाम.
उत्पादनात घट.
मिथेन उत्सर्जन कमी करण्यासाठी जनावरांच्या आहारामध्ये बदल
सुधारित खाद्य पद्धती
खाद्यामध्ये ऊर्जा आणि पचनक्षमता वाढवून फीड रूपांतर कार्यक्षमता वाढवता येते. अधिक उत्पादन क्षमता होते.
विशिष्ट प्रकारच्या खाद्य पदार्थांचा वापर
जनावरांच्या आहारात चारा देण्यासाठी पद्धत बदलून आहारात तेल किंवा तेलबियांचा समावेश करावा. कुरणाची गुणवत्ता सुधारून मिथेन उत्सर्जन कमी केले जाऊ शकते.
नैसर्गिक किंवा कृत्रिम आहारातील पदार्थ जसे, की ग्रोथ हार्मोन बोवाइन सोमॅटोट्रॉपिन आणि प्रतिजैविक जनावरांना त्यांच्या खाद्यामध्ये उपलब्ध संभाव्य ऊर्जेचा अधिक वापर करण्यास आणि मिथेनोजेनेसिस कमी करण्यासाठी मदत करू शकतात.
पशू व्यवस्थापन, प्रजननातील बदल
प्रजनन आणि सुधारित व्यवस्थापनाद्वारे
जनावरांची उत्पादकता वाढल्याने उत्पादनाच्या प्रति युनिट मिथेनचे उत्सर्जन कमी होऊ शकते. उदाहरणार्थ, मांस-उत्पादक प्राणी लहान वयात कत्तल वजनापर्यंत पोहोचल्यास, आजीवन मिथेन उत्सर्जन कमी केले जाऊ शकते.
चारा उत्पादन
सुधारित गवताच्या जातींची पेरणी करून उत्पादन वाढवणे
सुयोग्य चारा व्यवस्थापन
खराब झालेल्या जमिनींचे पुनर्वसन करणे
खाद्य गुणवत्ता सुधारणा
आहाराची पचनक्षमता सुधारणे.
आतड्यांतर्गत किण्वन प्रक्रियेत मिथेनचे प्रमाण कमी करण्यासाठी दृष्टिकोन
संतुलित आहार रचना.
हरितधरा ः निवडक फायटो स्रोतांचा वापर करून तयार केलेले अँटी-मिथेनोजेनिक फीड सप्लिमेंट आहे. यामध्ये कंडेन्स्ड टॅनिन, हायड्रोलायसेबल टॅनिन आणि सॅपोनिन्स असतात. हे उत्पादन आंतरिक मिथेन उत्सर्जन १८ ते २० टक्के कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. पशुधनाच्या खाद्यामध्ये समाविष्ट केल्यावर पशुधनाची उत्पादक कामगिरी सुधारण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
योग्य चाऱ्याचा प्रकार, खाद्याची योग्य प्रक्रिया.
चरबी पूरक घटकांचा वापर.
आयनोफोर्स, मिथेन अॅनालॉग्स, सॅपोनिन, टॅनिन, अत्यावश्यक तेल, दुय्यम चयापचयांचा वापर.
मिथेन उत्सर्जन कमी करण्यासाठी जनावरांची अनुवांशिक निवड.
अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडसचा वापर.
- डॉ. मनोजकुमार आवारे, ९४२१००७७८५, (विभाग प्रमुख, पशुपोषण व पशुआहार शास्त्र, बाएफ, उरुळी कांचन, जि. पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.