Lumpy Skin Disease : ‘माझा गोठा, स्वच्छ गोठा’ मोहिमेसाठी समिती नियुक्त

Animal Care : ‘लम्पी’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावनिहाय ‘माझा गोठा, स्वच्छ गोठा’ मोहीम राबविण्यात येणार आहे.
Lumpy Disease
Lumpy DiseaseAgrowon
Published on
Updated on

Solapur News : ‘लम्पी’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावनिहाय ‘माझा गोठा, स्वच्छ गोठा’ मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी गाव व तालुका स्तरावर समिती नियुक्त करण्यात आली आहे.

गटविकास अधिकाऱ्यांनी गावनिहाय आराखडे तयार करावेत, समिती सदस्यांनी दिलेल्या जबाबदारीचे वाटप करावे, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिले आहेत. जिल्ह्यात १ हजार ३० पशुधनाला लम्पीची लागण झाली होती. त्यात १७ जनावरांचा मृत्यू झाला होता.

Lumpy Disease
Lumpy Skin Disease: बुलडाण्यात ‘लम्पी’ प्रतिबंधक लसीकरण मोहीम वेगात

ग्रामपंचायत व पशुसंवर्धन विभागाने गोठ्यात सोडियम हायपोक्लोराइड व फिनेल फवारणी करावी, जनावरांच्या अंगावर सायपरमेथ्रीन १ मिली प्रतिलिटर पाण्यात फवारावे. प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणापासून ५ किमी परिसरात फॉगिंग मशिनद्वारे धुरळणी करावी.

लम्पी रोगाबाबत माहिती व लोकजागृती करण्यासाठी फ्लेक्स/ बोर्ड बनवावेत, घडीपत्रिका घरोघरी वाटप कराव्यात, लम्पी आजाराने मृत जनावरांची आठ फूट खोल खड्डा खोदून त्यात चुना टाकून विल्हेवाट लावावी.

Lumpy Disease
Lumpy Skin : खानदेशात ‘लम्पी’ प्रतिबंधक लसीकरण प्रक्रिया संथ

तालुकास्तरीय समितीने गावनिहाय पथके तयार करावीत, जिल्हा स्तरावरून उपलब्ध साहित्य वाटप करणे, मोहिमेत सहभागी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, गावनिहाय प्रशिक्षणाचा कार्यक्रम तयार करणे, सर्वेक्षण व फवारणीचा कार्यक्रम तयार करणे, याबाबत जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करावा, असे आदेश दिले आहेत. या मोहिमेत लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्षांना सहभागी करून घेण्याच्या सूचना समितीस दिल्या आहेत.

गाव, तालुका पातळ्यांवर समित्या

ग्राम पातळीवर समित्या नियुक्त करण्यात आल्या असून त्यात सरंपच, दुग्ध उत्पादक संघ, पोलिस पाटील, प्रगतशील शेतकरी, पशुधन विकास अधिकारी व ग्रामसेवक यांचा समावेश आहे. तालुका पातळीवरील समितीमध्ये तहसीलदार, गटविकास अधिकारी, सहायक आयुक्त पशुसंवर्धन, सहायक गटविकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी यांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com