Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon

Lumpy Skin : केंद्राच्या पथकाकडून जनावरांची पाहणी

राज्यात सर्वाधिक जनावरांचा ‘लम्पी स्कीन’मुळे मृत्यू बुलडाणा जिल्‍ह्यात झाले आहेत. या बाबीची दखल घेत राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्राच्या पथकाने जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात कुंड खुर्द येथे भेट देऊन जनावरांची पाहणी केली.
Published on

बुलडाणा ः राज्यात सर्वाधिक जनावरांचा ‘लम्पी स्कीन’मुळे (Lumpy Skin) मृत्यू बुलडाणा जिल्‍ह्यात झाले आहेत. या बाबीची दखल घेत राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्राच्या पथकाने जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात कुंड खुर्द येथे भेट देऊन जनावरांची पाहणी (Livestock Inspection) केली.

Lumpy Skin
Lumpy Skin : यवतमाळला आतापर्यंत ४९७ गुरांचा मृत्यू

लम्पी स्कीन आजारचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारच्या समितीने राज्यात काही जिल्ह्यांचा दौरा केला. मलकापूर तालुक्यात भेट देऊन पाहणी केलेल्या समितीत दिल्ली येथील पशुसंवर्धन विभाग, कृषी भवन येथील विभागीय अधिकारी डॉ. विजयकुमार, शास्त्रज्ञ डॉ. मंजुनाथ रेड्डी (बंगळूर), सहायक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. सुनील लहाने (पुणे) आदी उपस्थित होते.

Lumpy Skin
Lumpy Skin : वासरांतील लम्पी स्कीन रोगाला कसं रोखाल?

कुंड खुर्द येथील ग्रामपंचायतीमध्ये समितीने पशुपालकांशी संवाद साधला. बाधित व उपचाराने बरे झालेल्या जनावरांची पाहणी केली. तसेच पशुसंवर्धन विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांसोबतही चर्चा करीत उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केले.

या वेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रवीणकुमार घुले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अशोक लोणे आदी उपस्थित होते. केंद्राच्या अधिकाऱ्यांनी लम्पी स्कीनबाधित भागात पाहणी करून चर्चा केली. या अनुषंगाने ही समिती नेमके काय निष्कर्ष काढते, अहवालात कुठल्या बाबींचा समावेश केला जातो, याकडे लक्ष लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com