Lumpy Skin : यवतमाळला आतापर्यंत ४९७ गुरांचा मृत्यू

यवतमाळ : जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात सुरू झालेला ‘लम्पी’चा प्रादुर्भाव अजूनही कायम आहे. गेल्या तीन महिन्यांत ४९७ जनावरांचा मृत्यू झाल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे.
Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon

यवतमाळ : जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात सुरू झालेला ‘लम्पी’चा प्रादुर्भाव (Lumpy Skin Outbreak) अजूनही कायम आहे. गेल्या तीन महिन्यांत ४९७ जनावरांचा मृत्यू (Livestock Death) झाल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे. कोरोना काळात आलेल्या संकटावर मात करीत शेतकऱ्यांनी शेती केली. यातून सावरत नाही. तोच या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सहन करावे लागले.

Lumpy Skin
Lumpy Skin : वासरातील ‘लम्पी स्कीन’चे नियंत्रण

कापूस, सोयाबीन लागवड खर्चही निघू शकला नाही. शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला असताना सप्टेंबर महिन्यात लम्पी स्कीन आजाराचा शिरकाव झाला. बघता बघता या आजाराने गाय व बैलवर्गीय जनावरांना आपल्या कवेत घेतले. हा आजार सांसर्गिक असल्याने आतापर्यंत एकूण ११ हजार ७९९ जनावरांना बाधा झाली आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin : केंद्रीय पथकाकडून सावडीत आजारग्रस्त जनावरांची पाहणी

त्यापैकी सात हजार ९५० जनावरे आजारातून बरी झाली आहे. गंभीर आजारी असलेल्या ३२८ जनावरांवर पशुचिकित्सकांकडून उपचार केले जात आहे. तर ४९७ जनावरांचा मृत्यू झाला. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या पशुपालकांचे कंबरडेच मोडले. लम्पी स्कीन हा संसर्गजन्य आजार असल्याने डास, गोचिड, गोमाशा यापासून पशुधनाला सुरक्षित ठेवण्यासाठी नियमित गोठ्यांची स्वच्छता ठेवण्याचे निर्देश पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आले आहे.

तालुकानिहाय झालेले मृत्यू

जिल्ह्यात नेर, दारव्हा, दिग्रस, पुसद, महागाव या तालुक्यांत सर्वाधिक जनावरांचे लम्पी आजाराने मृत्यू झाले आहेत. तालुकानिहाय झालेले मृत्यू पुढीलप्रमाणे, यवतमाळ-१४, कळंब- चार, बाभूळगाव-३७, राळेगाव-पाच, घाटंजी-२१, पांढरकवडा-पाच, मारेगाव-तीन, वणी-एक, नेर-८०, दारव्हा-९३, दिग्रस-४१, पुसद-६५, महागाव-७८, उमरखेड-१७, झरी-दोन, आर्णी-३७, असे आहेत.

आजाराची लक्षणे कोणती?

लम्पी आजारात सर्वप्रथम जनावरला मध्यम स्वरूपाचा, तर काही वेळेस जास्त प्रमाणात ताप येतो.

जनावरांच्या डोळ्यांतून आणि नाकातून पाणी येते.

चारा खाणे, पाणी पिणे कमी होते, दुग्ध उत्पादन कमी होते.

लसिका ग्रंथीना सूज येते.

जनावरांच्या शरीरावर अंदाजे दोन ते पाच सेंटिमीटर व्यासाच्या कडक आणि गोल आकाराच्या गाठी येतात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com