Goat and Sheep Management : हिवाळ्यात शेळ्या, मेंढ्यांची कशी काळजी घ्यावी?

Winter care Management : हिवाळ्यात शेळ्या, मेंढ्यांची विशेष काळजी घ्यावी लागते कारण जास्त थंडीमुळं शेळ्यांची लहान करडं दगाऊ शकतात. शेळ्या, मेंढ्यांचा गोठा कोरडा, हवेशीर ठेवण्याचा प्रयत्न करावा.
Goat and Sheep Management
Goat and Sheep ManagementAgrowon
Published on
Updated on

Goat Rearing : हिवाळ्यात शेळ्या, मेंढ्यांची विशेष काळजी घ्यावी लागते कारण जास्त थंडीमुळं शेळ्यांची लहान करडं दगाऊ शकतात. शेळ्या, मेंढ्यांचा गोठा कोरडा, हवेशीर ठेवण्याचा प्रयत्न करावा. गोठ्यामध्ये ओलावा जास्त वेळ टिकून राहिल्यास गोठ्यातील तापमान कमी होतं. गोठ्याची दिशा दक्षिण-उत्तर किंवा पूर्व-पश्‍चिम बाजूने असल्यास सकाळी आणि सायंकाळी कोवळ्या सूर्यकिरणांमुळे गोठ्यातील ओलसरपणा कमी होतो.

गोठा कोरडा व स्वच्छ ठेवावा. सूर्यकिरणामुळे जंतुनाशक प्रक्रिया होऊन गोठे निर्जंतुक होण्यास मदत होते. गोठ्यातील जमिनीत चुनखडी किंवा मुरमाचा वापर केल्यास ओलसरपणा कमी होतो. जमिनीचे तापमान कमी करण्यास प्रतिबंध करता येतो. गोठ्यांच्या आजूबाजूला मोकळी जागा असावी. गोठ्याच्या दोन्ही बाजूस जागा ठेवून कुंपण करावे. स्वच्छ पाण्याची सोय करावी.

वयोमानाप्रमाणे शेळी, बोकड आणि लहान करडांची व्यवस्था करावी. आजारी आणि फुफ्फुसाचा आजार, जंत असे सांसर्गिक आजार झालेल्या करडांना ताबडतोब वेगळं करावं. हिवाळ्यात करडं, कोकरांचा निवारा उबदार असावा, अन्यथा त्यांच्या शरीराचे तापमान कमी होऊन ते जीवघेणे होऊ शकते.

दिवसा गोठ्याची दारे व खिडक्या खुल्या ठेवाव्यात, जेणेकरून हवा खेळती राहील. रात्री गोणपाट किंवा पोते यांनी शेड नीट झाकावे. जेणेकरून थंड हवा आत येण्यास प्रतिबंध होईल.

`

Goat and Sheep Management
Goat and Sheep Management : हिवाळ्यात शेळ्या मेंढ्यांवर ठेवा लक्ष

करडं, कोकरांचा बिछाना कोरडा, मऊ, उबदार असावा. करडांचा बिछाना साधारणपणे २ ते ३ दिवसांनी बदलावा. करडांचा निवारा हा नेहमी कोरडा, स्वच्छ आणि अमोनिया मुक्त असावा; कारण हा वायू करडांच्या फुफ्फुसांना दाह निर्माण करून खोकला, श्‍वसन संस्थेचे विकार निर्माण करतो. यातूनच जीवघेणा न्यूमोनियाचा आजार होतो.

कोकरांना थंडी जास्त वाजत असेल तर छोटी शेकोटी, विजेचा दिवा किंवा विजेची शेगडी वापरून गोठ्यातील हवा उबदार ठेवावी. त्यामुळे करडांना सर्दी, हगवण आणि न्यूमोनिया यांपासून संरक्षण होईल. शेकोटी करताना जास्त धूर होणार नाही याची काळजी घ्यावी. साधारणपणे गोठा एकदा उबदार झाल्यानंतर शेकोटी विझवावी. विजेचा दिवा साधारणपणे करडांपासून २० इंचांपेक्षा जास्त उंचीवर छताला टांगावा. विजेच्या दिव्याला संरक्षक पिंजरा असावा.

करडं, कोकरांना स्वच्छ आणि कोमट पाणी पिण्यासाठी दिले, तर त्यांची मूत्रसंस्था सुस्थितीत राहण्यास मदत होते. एखाद्या करडाला खूप थंडी लागली असेल, तर त्याचे शरीर कोमट पाण्यात ४ ते ५ मिनिटे बुडवून ठेवावे, पण डोके पाण्याच्या वर ठेवावे. नंतर त्याचे शरीर व्यवस्थित चोळून त्याला स्वच्छ, कोरड्या गोणपाटात लपेटावे. कोरड्या जागी ठेवावे, कोमट दूध पाजावे.

नवजात करडाला त्याच्या वजनाच्या दहा टक्के इतका चीक द्यावा, त्यामुळे करडात नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती येते. पोट साफ होण्यास मदत होते. चीक पाजल्यामुळे मरतुकीचे प्रमाण २ ते ३ टक्क्यांनी कमी करता येते.

शेळ्या, मेंढ्यांचे मुक्त संचार पद्धतीने संगोपन केले जात असेल, तर त्या ठिकाणी एका कोपऱ्यात एखादा बंदिस्त गोठा जरूर असावा. जेणेकरून रात्रीच्या वेळी शेळ्या, मेंढ्या तेथे जाऊन बसतील. थंडीपासून संरक्षण होईल.

शेळ्या, मेंढ्या आणि लहान करडांना सकाळच्या वेळी कोवळ्या उन्हात मोकळे सोडावे, जेणेकरून त्यांना सूर्यप्रकाशातून ऊब मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com