Soybean Processing : सोयाबीन प्रक्रिया उद्योग फायद्याचा

Soya products : सोयाबीनला अपेक्षित बाजार भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. पण शेतकऱ्यांनी त्यावर प्रक्रिया करून विविध प्रकारचे पदार्थ बनवून आर्थिक संधी मिळू शकतात.
Soybean Processing
Soybean ProcessingAgrowon
Published on
Updated on

Soybean Milk : महाराष्ट्रात खरीप हंगामातील प्रमुख पीक म्हणून  सोयाबीन पिकाकडे पाहिल जात. पण अतिवृष्टी, पावसाचा खंड आणि यंदा आलेल्या 'येलो मोझॅक'सारख्या रोगामुळे सोयाबीन उत्पादक मेटाकुटीला आला आहे. त्यात सोयाबीनला अपेक्षित बाजार भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे.  पण शेतकऱ्यांनी त्यावर प्रक्रिया करून विविध प्रकारचे पदार्थ बनवून आर्थिक संधी मिळू शकतात. त्यातून शेतकऱ्यांची उत्पन्नामध्ये तर वाढ होईलच, त्याचबरोबर नवीन उद्योगाच्या संधीही त्यांच्यासमोर उभ्या राहतील.

सोयाबीन मध्ये सर्वाधिक म्हणजे ४० टक्के प्रथिने असतात.  तर २० टक्के तेलाचे प्रमाण असतं. तरिही आपल्याकडे सोयाबीन हे तेलवर्गीय पीक मानल जात. कोणत्याही शाकाहारी किंवा मांसाहारी पदार्थापेक्षा सोयाबीनमधील प्रथिनांच हे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सोयाबीनला मानवी आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्व आहे. पण या बद्दल कुणाला फारशी माहितीच नाही त्यामुळे सोयाबीन प्रक्रियेकडे कुणी वळत नाही.  

भारतात मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यात सोयाबीनच मोठ्या प्रमाणात उत्पादन होत. शेतकरी सोयाबीनची काढणी झाली की लगेच विक्री करुन टाकतात. पण आहारात वापरत नाहीत. सोयाबीनचा मानवी आहारात थोड्या प्रमाणात जरी वापर केला तरी त्यापासून मिळणारे फायदे हे जास्तच आहेत.  

सोयाबीनमध्ये पौष्टिक घटकांबरोबर काही अपौष्टिक घटकही आहेत. त्यामुळे पचन संस्थेत बिघाड होऊन आरोग्यास हानी होऊ शकते. त्यामुळे सोयाबीन प्रक्रिया करुनच आहारातून घ्याव लागत.  प्रक्रिया करुन म्हणजे सोयाबीन आहारात नेमक कस वापरायच?  तर सुरुवातीला सोयाबीन साधारणपने तीन तास भिजवून, त्यानंतर अर्धा तास पाण्यात उकळून घ्यावे. हे उकळलेले सोयाबीन नंतर सुकवून वापरावे. 

Soybean Processing
Soybean Processed Food : सोयाबीन प्रक्रिया पदार्थाचा प्रचार, प्रसार करावा

सोयाबीनपासून कोणते पदार्थ बनवता येतात?

गहू, ज्वारी, किंवा बाजरी या धान्याचा वापर आपण रोजच्या आहारात करत असतो.  तसच रोजच्या आहारात जर सोयाबीन घ्यायच असेल तर  ९ किलो गहू, ज्वारीच्या पिठाबरोबर १ किलो सोयाडाळीच्या पिठाचा वापर करुन सोयाबीनचा रोजच्या आहारात वापर करता येऊ शकतो.   याशिवाय रोस्ट करुन मीठ लावून सोयाबीनचे खारेमुरे बुनवुनही सोयाबीनचा वापर करता येतो.  सोयादूध, सोयापनीर हे पदार्थही आहारातून घेता येतात.  

एक किलो भीजवलेले सोयाबीन ५ ते ६ लिटर पाणी घालून वाटल्यास त्यापासून सोयादूध मिळते. हे दूध नंतर उकळून वापरता येते.  १ किलो साोयाबीनपासून ७ लिटर दूध मिळते. या दुधापासून पनीर म्हणजेच टोफू ही आपण बनवू शकतो.  दुधाचे पनीर आणि टोफू हे एकसारखेच दिसतात. दोन्हीतूनही १४ टक्के प्रथिने मिळतात. पण पनीर पेक्षा टोफू हे स्वस्तात तयार होत. त्यामुळे कमी खर्चात टोफू सारखा चांगला पदार्थ सहजपने आहारातून घेता येतो.  

सोयापदार्थांविषयी जनजागृती करण्याची गरज 

सोयाबीन प्रक्रियेमुळे सोयाबीन म्हटल की आपल्याला फक्त सोयाबीन तेल दिसते. पण तेलाशिवायही सोयाबीनपासून प्रक्रियायुक्त पदार्थ बनविता येतात.  हे आरोग्यासाठी फायदेशिर आहेत. सोयाबीन च्या दुधाचे मार्केटमध्ये सोयादूध म्हणून ब्रॅंन्डिग झाले पाहिजे.  याशिवाय शाळांमध्ये मध्यान्ह भोजनात सोयाबीन पदार्थांचा समावेश झाला पाहिजे. तरच सोयाबीनचा लोकांच्या आहारात वापर वाढेल. आणि सोयाबीनची मागणीही वाढेल.

स्पेशल फूड म्हणून सोयाबीनचे ब्रॅन्डिग झाल्यास त्याचा फायदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनाही होईल. सोयाबीन मध्ये प्रथिनांचे प्रमाण डाळी, शेंगदाणे, मांस व मासे यांच्या तुलनेत दुप्पट, अंड्याच्या तिप्पट व दुधाच्या दहापट इतके आहे, त्यामुळे सोयाबीनपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती आणि विक्रीसाठी मोठा वाव आहे.  फक्त सोयाबीन पदार्थाबाबत जनजागृती होण्याची गरज आहे हे लक्षात घेतल पाहिजे. 

माहिती आणि संशोधन - डॉ. पुनित चंद्र,  आयसीएआर सेन्टर ऑफ एक्सलंन्स, भोपाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com