Team Agrowon
गोठा कोरडा व स्वच्छ ठेवावा. सूर्यकिरणामुळे जंतुनाशक प्रक्रिया होऊन गोठे निर्जंतुक होण्यास मदत होते.
शेळ्या, मेंढ्यांचे मुक्त संचार पद्धतीने संगोपन केले जात असेल, तर त्या ठिकाणी एका कोपऱ्यात एखादा बंदिस्त गोठा जरूर असावा.
दिवसा गोठ्याची दारे व खिडक्या खुल्या ठेवाव्यात, जेणेकरून हवा खेळती राहील. रात्री गोणपाट किंवा पोते यांनी शेड नीट झाकावे. जेणेकरून थंड हवा आत येण्यास प्रतिबंध होईल.
वयोमानाप्रमाणे शेळी, बोकड आणि लहान करडांची व्यवस्था करावी. आजारी आणि फुफ्फुसाचा आजार, जंत असे सांसर्गिक आजार झालेल्या करडांना ताबडतोब वेगळं करावं.
हिवाळ्यात करडं, कोकरांचा निवारा उबदार असावा, अन्यथा त्यांच्या शरीराचे तापमान कमी होऊन ते जीवघेणे होऊ शकते.